मोबाईलवर मॅसेज आला का आधार केवासयी करा@चला तर मग ओळखीचा पूरावा ,आधार कार्ड घेवून आधार केंन्द्र मध्ये

91
 आधार कार्ड ही सामान्य माणसाची ओळख आणि गरज बनली आहे. तुमच्या बँक खात्यापासून ते पॅन कार्डपर्यंत सर्वच ठिकाणी ते उपयुक्त आहे.तसं पाहिलं तर सध्याच्या काळात प्रत्येकाचं आधार कार्ड आहे. मात्र जर तुमचं नसेल. किंवा तुम्हाला तुमच्या मुलांच आधार कार्ड काढायचं असेल तर तर तुम्हाला ही प्रक्रिया फॉलो करावी लागेल. नवीन आधार कार्डसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्ही प्रथम तुमच्या जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट दिली पाहिजे. तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुमच्या घराजवळील नावनोंदणी केंद्र शोधून ते निवडू शकता. येथून तुम्ही तुमच्या जवळच्या आधार सेवा केंद्राची ऑनलाइन अपॉइंटमेंट घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही येथे जाऊन नवीन आधार कार्डसाठी नावनोंदणी करू शकता. तसेच, तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये कोणतीही नवीन माहिती अपडेट करायची असल्यास, तुम्ही या आधार सेवा केंद्रांना भेट देऊन ते देखील करू शकता.

सावधान! डेबिट कार्ड वापरताना तुम्ही करताय ‘ही’ चूक, होईल मोठे नुकसान

नावनोंदणी केंद्रावर जाण्यापूर्वी ही माहिती आवश्यक आहे

आधारसाठी अर्ज करण्यापूर्वी, अर्जदाराकडे यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे असल्याची खात्री करून घ्यावी. केंद्रात जाण्यापूर्वी ही सर्व कागदपत्रे सोबत घेऊन जा. तुम्हाला नावनोंदणी केंद्राला भेट देऊन आधार अॅप्लीकेशन फॉर्म भरावा लागेल आणि ओळखीचा पुरावा आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह तुमची बायोमेट्रिक माहिती सबमिट करावी लागेल.आधार कार्डसाठी अर्ज करण्याची step by step प्रक्रिया

-सर्वप्रथम, तुमच्या जवळ एक आधार सुविधा केंद्र शोधा. तुम्ही आधारच्या https://uidai.gov.in/ या वेबसाइटला भेट देऊन ही माहिती मिळवू शकता. -यानंतर, या आधार सुविधा केंद्रांना भेट देऊन तुमचा ओळख प्रमाणपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्र यांसारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांसह फॉर्म सबमिट करा. -एकदा सर्व कागदपत्रे स्वीकारल्यानंतर, फिंगरप्रिंट्स आणि डोळ्यांच्या बुबुळांच्या डिटेल्ससह तुमचा बायोमेट्रिक डेटा सबमिट करा. -येथून तुम्हाला एक पावती मिळेल ज्यावर 14 अंकी नोंदणी क्रमांक लिहिलेला असेल. याचा वापर करून तुम्ही तुमच्या आधार कार्डचे स्टेटस जाणून घेऊ शकता.