होळीनिमित्त झोपड पट्टी वस्तीतील चिमुकल्यांसाठी गाठीचे वाटप.रशिदा शेख यांचा स्तुत्य उपक्रम..
आज होळी निर्मीत्य रशिदा शेख हयंानी आपल्या वार्डातील लहान मुलांना घरोघरी जावून गाठी देण्यात आली त्यांच्या उपक्रमाने आजूबाजूतील नागरीकांना या उपक्रमाचे सामाजिक क्षेत्रात स्वागत व कौतुक करण्यात येत आहे.सध्याच्या आधुनिक तंत्रयुगात जुन्या प्रथा, परंपरा मागे पडत आहेत. सण, उत्सव साजरे करण्याच्या पद्धतीत होत असलेला बदल याचे सुतोवाच देतो. होळीला घरोघरी चिमुकल्यांसाठी गाठी पाठविली; होळीला पूरणपोळी, रंग, गुलाल, पिचकारी याचे जसे महत्त्व आहे तोच गाठीचाही मान आहे. ज्यांच्याकडे लहान मुले आहेत तिथे खाऊ म्हणून होळीला गाठी पाठवतात.
भारतीय सण, उत्सव आणि ते साजरे करण्याच्या पद्धतीला शास्त्रीय कारणे आहेत. गाठी घरोघरी देवून सामाजिक सलोखा कायम राहावा हा उद्देश असावा. शिवाय आरोग्याच्या दृष्टीने गाठीचे महत्त्व आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सानिध्यात वापरत असलेल्या या पिढीला गाठीचे महत्त्व तितकेसे वाटत नसावे, असे दिसून येते. फास्ट फुडची ‘क्रेझ’ असणा°या सध्याच्या चिमुकल्यांच्या गळ्यात होळीला गाठी विरळच दिसून येते. \व्हर्म्युअल जगात समाज माध्यमांचा वापर वाढला असून ते मोठ्या प्रमाणात प्रभावी ठरतात. होळी सणाचे संदेश मोबाईलवर दोन दिवसांपूर्वीपासून खणखणत असताना गाठीचा खाऊ मात्र आनंदात दिसून येत आहे असल्याचे दिसते.
द्वेष क्लेश काढून मन निर्मल करणारा हा सण आहे. या सणांमध्ये तोंड गोड केल्याशिवाय आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कोणताही सण संपूर्ण होत नाही. त्याच प्रमाणे होळीच्या सणाला गाठीचे एक खास विशेष महत्त्व आहे. आजही पाडल्याचा ते पांढरेशुभ्र गाठी घालून मिळवण्याची विशेषता बच्चे कंपनीमध्ये खूप हौस असते. होळीला पूरणपोळी रंग गुलाल की पिचकारी याचे जसे महत्व आहे.