(NEET UG) राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा-2023@12वी उत्तीर्ण (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, & बायोटेक्नोलॉजी)

113

परीक्षेचे नाव: NEET (UG) – 2023

वैद्यकीय शिक्षणासाठी इच्छुक असलेल्या  विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने NEET UG साठी अधिसूचना जारी केली आहे.

राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा – अंडर ग्रॅज्युएट (NEET UG 2023) साठी अर्ज नोंदणीची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. NEET UG 2023 ची परीक्षा 7 मे रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतली जाणार आहे. उमेदवार NEET UG 2023 साठी अधिकृत वेबसाइट,

शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, & बायोटेक्नोलॉजी)

वयाची अट: 31 डिसेंबर 2023 किमान 17 वर्षे.

Fee: General: ₹1700/-  [EWS/OBC: ₹1600/-   [SC/ST/PWD/Third Gender: ₹1000/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 एप्रिल 2023 (09:00 PM)

परीक्षा: 07 मे 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

वर अर्ज नोंदवू शकतात.

NEET (UG) 2023 ची परीक्षा एकूण १३ भाषांमध्ये होणार आहे. त्यात इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दूसह विविध भाषांचा समावेश आहे.
NEET UG 2023 च्या अभ्यासक्रमात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तीन विषयांचा समावेश आहे. NEET UG 2023 प्रवेश परीक्षेत 11वी आणि 12वी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषय असतील.

NEET UG 2023 परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना इयत्ता 10वी, इयत्ता 12वीची मार्कशीट, आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. NEET UG 2023 ची परीक्षा NEET UG 2022 प्रमाणेच घेतली जाईल अशी अपेक्षा आहे. NEET UG 2023 ची परीक्षा 720 गुणांची असेल.

अशी करा नोंदणी
– सर्व प्रथम उमेदवारांनीneet.nta.nic.inच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
– मुख्यपृष्ठावर, NEET UG अर्ज नोंदणी फॉर्मसाठी लिंकवर क्लिक करा.
– आवश्यक माहिती आणि आपले संपर्क तपशील भरा.
– तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि इयत्ता 10वी आणि 12वीच्या कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करा.
– NEET UG 2023 परीक्षा अर्ज फी सबमिट करा.
– फॉर्म सबमिट करताना कन्फर्मेशन पेज डाउनलोड करा.
– भविष्यातील हेतूंसाठी ते जतन करा.

NTA NEET UG 2023 Exam Registration Started