जागतिक महिला दिन कार्यक्रम@कर्मवीर महाविद्यालय मूल

99

कधी शौर्याची ढाल, कधी मायेची उबदार शाल, प्रत्येक स्त्रीच्या आत्मविश्वासाला सलाम अशा शब्दांत महिला दिनाच्या शुभेच्छा देत
शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित कर्मवीर महाविद्यालय मूल जि.चंद्रपूर येथे जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात प्राचार्य डॉ.अनिता वाळके यांनी महिलांच्या आयुष्यातील टप्पे सांगताना मुलगी ,बहिण,आई,सून,पत्नी, मैत्रिण, सहकारी अशा विविध भुमिका अत्यंत प्रामाणिकपणे ती पार पाडते.न थकता संपूर्ण कुटुंबासाठी ती झटते. इतिहास साक्षी आहे अनेक यशस्वी पुरुषाच्या यशामागे स्त्रीचा आधार होता .तिच्यात विश्व सामावलेले आहे.ती कुटुंबाचा कणा आहे आणि म्हणूनच तिचा सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.असे मत व्यक्त केले.
महिलांचे प्रेरणास्थान माता सावित्रीबाई व जिजाऊ यांच्या प्रतिमेच्या पुजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
मूल नगरातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान.रंजनीताई घुगरे,माजी विद्यार्थीनी, पोलिस कान्स्टेबल वर्मा मॅडम,कुळमेथे मॅडम यांच्या कार्याचा गुणगौरव म्हणून शाल व श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तुत्व ,बदलत्या काळानुसार स्वतः बदलाची सुरुवात करीत येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्याची तयारी म्हणजे महिला दिनाच्या आयोजनाचे फलित होय या शब्दात आपले विचार पुष्प गुंफणारे पत्रकार . दीपक देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात महिलांनी पुर्वी केलेला संघर्ष वेगळा होता.आजच्या युवतीपुढील संघर्ष वेगळा असेल पण धैर्य, चिकाटीने कोणत्याही गोष्टीवर मात करता येते यावर प्रकाश टाकला.आणि आजच्या कार्यक्रमातून तुम्ही हा बदल स्विकारुन संवाद साधायला आणि आपल्या मनातील भाव इतरांसोबत सामायीक करीत लिखाण करायला व व्यक्त व्हायला लागलात तर ह्या आयोजनाचे फलित झाले असे मानता येईल असाही विचार पुढे ठेवला.
प्रणाम तिच्या कर्तृत्वाला, दातृत्वाला, आणि मातृत्वाला, वंदन तिच्या त्यागाला, ममतेला आणि वात्सल्याला…या महिला दिनी करूया जागर स्त्रीशक्तीचा..
मान रंजनीताई घुगरे (कवाडकर) यांनी याच महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी असल्याचे स्पष्ट करीत विद्यार्थ्यांनी मेहनत करायची तयारी असेल तर अनेक स़ंकटातून पुढे जाता येते याचे ती स्वतः जीवंत उदाहरण आहे. तिने स्वतःच्या जीवनातील अनुभव सांगुन विद्यार्थीनींनी विश्वास संपादन करून आत्मविश्वासाने आपले कार्य यशस्वी करावे अशी मौलिक माहिती दिली.

हा दिवस साजरा करण्याचे औचित्य व त्याचा प्रभावाची माहिती डॉ.उज्वला कापगते मॅडमनी आपल्या प्रास्ताविकात मांडली तर महिलांच्या प्रगतीचा आढावा डाॅ. विभावरी हाते यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. महाविद्यालयातील विद्यार्थी योगेश सिडाम याने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार प्राजक्ता चौखुंडे हिने मानले.
याप्रसंगी डाॅ.केवल कऱ्हाडे,डाॅ.गणपत आगलावे, प्रा.गजानन घुमडे,प्रा.कमलेश नागोसे,प्रा.भुषण वैद्य, प्रा.गुरवे मॅडम, महाविद्यालयाचे कर्मचारी व विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.प्रा निरज चन्ने यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.जागतिक महिला दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजुन घेता यावे व या दिनी आपण नवीन काहीतरी शिकून आफल्या जिवनातील यशाचा मार्ग शोधता यावा या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.