महिलांनीच चालविले मुल पोलिस ठाणे

102

पोलिस ठाण्यात ठाणेदार महिला, स्टेशन अंमलदार महिला, संगणक चालक, वायरलेस चालक इतकेच काय तर पोलिस  सुद्धा महिलाच. संपूर्ण ठाणेच सावित्रीच्या लेकींच्या हाती होते. असे चित्र बुधवारी मुल पोलिस ठाण्यात बघायला मिळाले. औचित्य होते जागतिक महिला दिनाचे.

जागतिक महिला दिनानिमित्त पोलिस अधीक्षक यांच्या संकल्पनेनुसार,रविन्द्रसिंह परदेशी तसेच अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम याचे मार्गदर्शनात ठाणेदार सुमित परतेकी यांनी पोलिस ठाण्याची सुत्रे महिला पोलिस अधिकारी यांच्या हातात सोपवून दिवसभरात कार्य केले.

पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांनी आपल्या अखत्यारीत असलेल्या पोलीस स्टेशनचा संपुर्ण कार्यभार पोलिस उपनिरीक्षक नेहा सोळकी यांचेकडे सोपवून ठाणे प्रभारी अधिकारी पदी नियुक्त करून त्याना सन्मानित करण्यांत आले. व पोलीस स्टेशन डयुटी ऑफीसर म्हणुन महिला सफौ. कल्पना कुळमेथे, मदतनिस मपोअ सिमा वर्मा, स्टेशन डायरी, टि.ओ. टि. डयुटी मपोअ शालीनी नैताम, किरण नागोसे व इतर महत्वाचे डयुटीवर महिला अंमलदार याना नियुक्त करण्यांत आले. व संपुर्ण पोलीस स्टेशन येथील कामकाज महिला अधिकारी अंमलदार याचेकडे सुपुर्द करून जागतिक महिला दिन साजरा करण्यांत आला.
ह्या आगळ्या कार्यपद्धती मुळे महिला पोलिस अधिकाऱ्यांना या दिवसभरात घडणाऱ्या विविध घटनांचा तपास व त्यावर घ्यायच्या निर्णयाची जबाबदारी स्विकारुन त्यावर अंमल करता आला व महत्वाची कार्यपूर्ती सहजगत्या करता आली आणि आपल्या कर्तव्याची चुणूक दाखविता आली.हे विशेष..