शिक्षण क्षेत्रात एमएचटी सीईटी (MHT CET) ही परीक्षा अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी सेलने अंडरग्रॅज्युएट प्रोग्राम्ससाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे.
यात बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग, बॅचलर ऑफ फार्मसी आणि अॅग्रीकल्चर शाखांचा समावेश आहे. बीई, बीफार्म आणि अॅग्रीकल्चर प्रोग्राम्ससाठीची एमएचटी सीईटी अर्जप्रक्रिया 8 मार्चपासून सुरू झाली आहे. एमएचटी सीईटी 2023 साठीची अर्ज प्रक्रिया 7 एप्रिलपर्यंत सुरू राहिल.
अर्जदार mhtcet2023.mahacet.org या वेबसाइटवर अर्ज सबमिट करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना बीई, बीफार्म किंवा अॅग्रीकल्चर शाखेत प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनी या परीक्षेसाठी तत्काळ अर्ज दाखल करणं गरजेचं आहे. एमएचटी सीईटी 2023 च्या तारखांनुसार, नोंदणी प्रक्रिया 7 एप्रिलला संपणार असून, उमेदवार 8 ते 15 एप्रिल 2023 दरम्यान सर्व श्रेणींसाठी 500 रुपये अतिरिक्त विलंब शुल्कासह वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करू शकतील.
एमएचटी सीईटी 2023 अर्ज कसा दाखल कराल?
स्टेप 1. सर्वप्रथम mhcet2023.mahacet.org या एमएच सीईटीच्या अधिकृत वेबसाइटवर जावं.
स्टेप 2. त्यानंतर एमएचटी सीईटी बीई, बीफार्म आणि अॅग्रीकल्चर या नोंदणी फॉर्म लिंकवर क्लिक करावं.
स्टेप 3. लिंकवर क्लिक केल्यानंतर लॉगिन क्रेडेन्शियल जनरेट करण्यासाठी मूलभूत माहिती भरावी.
स्टेप 4. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावं.
स्टेप 5. वैयक्तिक आणि शैक्षणिक तपशीलांसह एमएचटी सीईटीचा अर्ज भरावा. स्टेप 6. आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करून सबमिट करावीत. स्टेप 7. त्यानंतर एमएचटी सीईटीचा फॉर्म डाउनलोड करावा. या अर्जासोबत सर्वसाधारण प्रवर्गातल्या उमेदवारांना अर्ज फी म्हणून 800 रुपये भरावे लागतील.
महाराष्ट्रात अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) उमेदवारांना 600 रुपये भरावे लागतील.
महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात एमएचटी सीईटी ही बीई, बीटेक आणि बीफार्म या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दर वर्षी घेतली जाणारी राज्यस्तरीय परीक्षा आहे.
हे अभ्यासक्रम देशातल्या विविध राज्यांमधल्या शासकीय आणि खासगी संस्थांद्वारे चालवले जातात. अन्य राज्यांचे उमेदवारदेखील एमएचटी सीईटी परीक्षेला बसण्यास पात्र असतात.