एमपीएससीकडून 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींमध्ये उमेदवाराची वयोमर्यादा संपुष्टात आल्यास विहित कमाल वयोमर्यादेमध्ये दोन वर्षाची शिथिलता देण्यात येणार आहे.
या संदर्भात एमपीएससीने आज परिपत्रक जारी केले आहेत. ज्या उमेदवारांची वयोमर्यादा संपुष्टात आली आहे अशा उमेदवारांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी विहित कमाल वयोमर्यादेमध्ये दोन वर्षाची शिथिलता देण्यासंदर्भात शासनाने निर्णय घेतला आहे. 3 मार्च रोजी राज्य सरकारकडून याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यानंतर आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
विविध कारणामुळे पुरेशा जाहिराती प्रसिद्ध न झाल्याने ज्या उमेदवारांना परीक्षांना बसण्याची संधी प्राप्त झाली नाही आणि त्यांची कमाल वयोमर्यादा संपुष्टात आली आहे, अशा उमेदवारांना परीक्षांना बसण्याची संधी प्राप्त व्हावी, यासाठी 2 मार्च 2023 रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या शासन निर्णयाद्वारे 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी विहित कमाल वयोमर्यादेमध्ये दोन वर्षाची शिथिलता देण्याबाबत शासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे.
‘या’ भरतीसाठी वयोमर्यादेमध्ये शिथिलता
उपअभियंता, विद्युत , गट अ
उपसंचालक, गट अ, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा
मुख्य खोदन अभियंता, गट अ, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा
सहाय्यक रसायनी, गट ब, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा
सहाय्यक प्रशासन अधिकारी,गट ब, भूजल सर्वेक्षण व विकास योजना
सहाय्यक आयुक्त, तांत्रिक, महाराष्ट्र तांत्रिक सेवा गट ब
सहाय्यक संचालक, राज्य रेशीम सेवा गट अ
रेशीम विकास अधिकारी राज्य रेशीम सेवा, श्रेणी एक, गट ब
सहाय्यक संचालक, गट ब सांस्कृतिक कार्य संचालनालय
महाराष्ट्र राज्यपत्रीत नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023
या सर्व जाहिरातीमध्ये अनुसरून विहित पद्धतीने अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज सादर करण्यास अंतिम दिनांक 3 एप्रिल 2023 पर्यंत असेल.