शाळा-कॉलेज प्रवेशासाठी ही प्रमाणपत्रे आवश्यक @पाल्यास प्रवेश मिळविताना भासते गरज

110

रहिवासी अन उत्पन्नाचा दाखला काढून ठेवला का?
काही शाळांत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून काही शाळा तसेच महाविद्यालयात येत्या काही दिवसांत प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. शाळेत प्रवेश घेताना विविध कागदपत्रांची गरज राहत असून बहुदा कागदपत्र : अभावी प्रवेश मिळत नाही. इतकेच नव्हे तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होते. त्यामुळे वेळीच विविध कागदपत्रे काढलेली बरी असा सल्ला ज्येष्ठ नागरिकांकडून दिला जात आहे.

विविध कागदपत्रांसाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर करून अर्ज करता येत असून सुविधा केंद्रांच्या माध्यमातूनही विविध कागदपत्रांसाठी अर्ज करून ते प्राप्त करता येतात. नवीन शैक्षणिक सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याने  तालुक्यातील सुविधा केंद्रांवर सध्या पालकांची गर्दी होत असल्याचे बघावयास मिळत आहे.

नागरिकांची अडचण लक्षात घेता काही सेवा केंद्र चालक जादा पैसेही उकळतात.
जास्तीचे पैसे घेतले जात असतील तर तक्रार करा ■ सुविधा केंद्रात वरील सर्व
प्रमाणपत्र 35,५६ रुपयाच्या शुल्कात शासकीय दराप्रमाणे मिळतात. ■ प्रमाणपत्रासाठी जास्तीची रक्कम आकारल्यास तहसीलदार आणि वरिष्ठांकडे तक्रार दाखल करता येते.

उत्पन्नाचा दाखला
एसी, एसटी, ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश दरम्यान उत्पन्नाचा दाखला मागितला जातो. शिवाय शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्याला त्याच्या पालकांचा उत्पन्नाचा दाखला सादर करणे गरजेचे असते.

रहिवासी प्रमाणपत्र शाळा व महाविद्यालयात प्रवेश दिला जात असताना रहिवासी प्रमाणपत्राची मागणी होते. तो तहसील कार्यालयाच्या वतीने निर्गमित होत असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येतो.

राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र | शाळा-महाविद्यालयात प्रवेशादरम्यान बहुदा राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र मागितले जाते. हे प्रमाणपत्र भारतीय असल्याचा पुरावा म्हणूनग्राह्य धरल्या जात असल्याचेसांगण्यात आले.

जात प्रमाणपत्रविविध प्रवर्गात मोडतअसल्यास प्रवेशासाठी व प्रवर्ग सवलतीसाठी जातीचापुरावा म्हणून जात प्रमाणपत्र हे महत्त्वाचे असते.त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने  अर्जही करता येतो.

ई. डब्ल्यू. एस. प्रमाणपत्र :
आर्थिक सवलतीसाठी लाभार्थी विद्यार्थ्याला ई. डब्ल्यू. एस. प्रमाणपत्र शाळा व महाविद्यालयात सादर करणे गरजेचे आहे. ते प्रमाणपत्र पाल्यांच्याप्रवेशासाठी काढून द्यावे लागते.