मुल – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्व खासदार राहुलजी गांधी यांचा भारत जोडोचा संदेश प्रतेक गावात खेड्यात घरात पोहचावा या हेतूने अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जाहीर केलेल्या धोरणानुसार व प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे यांचे सूचनेनुसार काँग्रेस नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष यांचे खांभिर नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली तालुका काँग्रेस कमिटीच्या सहकार्याने युवक काँग्रेस कमिटी तर्फे “हात से हात जोडो अभियान” जनजागृती करण्यासाठी मुल तालुक्यातील बेंबाळ येथे राबविण्यात आला. याप्रसंगी गावातील नागरिकांशी हातभेट घेऊन नागरिकांना हाथ से हाथ जोडो अभियानाबाबत काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती देत भारत जोडो अभियान राबऊन गावातून पदयात्रेच्या माध्यमातून एक संदेश देण्यात आला. याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस व संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती घनश्याम येनुरकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, युवक काँग्रेस अध्यक्ष पवन नीलमवार, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली संतोषवार ,शहर अध्यक्ष सुनील शेरकी, ज्येष्ठ नेते दीपक पा. वाढई, पंचायत समिती माजी उपसभापती दशरथ वाकुडकर, युवा संघटन नेतृत्व प्रशांत उराडे, ग्राम. पं.सरपंच चांगदेव केमेकार, बेंबाळ कमिटी प्रमुख पराग वाढई, उपसरपंच देवाजी ध्यानबोईनवार, माजी सरपंच विजय बोम्मावार, सदस्या अरूणा गेडाम,विनोद वाढई,कविता नंदिग्रमवर,आशाताई शेंडे,आशाताई मडावी, ज्येष्ठ कार्यकर्ते माणिक भडके, किशोर नंदीग्रामवार, बाबराळा ग्राम.पंचायत सरपंच धीरज गोहने, दिवाकर गुरनुले, चकदुगाळा येथील युवा काँग्रेस कार्यकर्ते स्वागत वणकर, दीपक कोटगले, महिला काँग्रेस पदाधिकारी शामलता बेलसरे, वैशाली काळे, लता निंदेकर, विनोद चुदरी, उपदेश कत्रोजवार, विजुताई एरमे,रुपेश अन्मलवार,मुरलीधर राऊत,वासुदेव राऊत, मंगरुजी कुरीवार,प्रवीण जेद्दीवार, रजित गेडाम,सचिन वाळके, यांचेसह नवेगाव (भू) ,चकदुगाळा,बाबराळा येथील काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.पदयात्रेचे रूपांतर ग्राम पंचायत सभागृहात सभेमध्ये करण्यात आले. भारत जोडो, हात से हात जोडो अभियान व काँग्रेसचे संघटन यावर राकेश रत्नावार,घनश्याम येनुरकर, दीपक पा. वाढई,प्रशांत उराडे, चांगदेव केमेकर, यांनी मार्गदर्शन केले. संचालन तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरु गुरनुले यांनी केले तर आभार माजी सरपंच विजय बोम्मावार यांनी मानले.
Home आपला जिल्हा Breaking News बेंबाळ येथे भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस पक्षाच्या ‘हाथ से हाथ जोडो अभियानातंर्गत’ पदयात्रा