Rte 25 % ऑनलाईन प्रवेश सन 2023-2024 करिता बालकांच्या पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक 01/3/2023 रोजी दुपारी 3 नंतर ते दिनांक 25/3/2023 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत सुरू राहील.
महत्वाची सूचना : आर. टी. ई 25% चे ऑनलाईन प्रवेश अर्ज सर्व पालक भरण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन site स्लो होऊ शकते त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा.
RTE 25% Admission 2023-24 Date update :-
नमस्कार मित्रांनो,आर.टी.ई २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दिनांक ०१ मार्च पासून सुरू झाली आहे,या शैक्षणिक योजने अंतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक हक्क अधीनियमनुसार दुर्बल व वंचित घटकानुसार २५% ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे . ( RTE Admission Update) यावर्षी शैक्षणिक प्रवेश प्रक्रियामध्ये सुरुवात झाल्या पासून पालकांना सर्व्हर प्रॉब्लेम येत असल्यानं अनेक जणांना फॉर्म भरता आलं नाही. म्हणून प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य Rte 25% ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया मुदतवाढ बाबत आदेश जारी केली आहे
सन २०२३-२४ शैक्षणिक वर्षाकरिता RTE 25% Admission सुरुवात दिनांक ०१ मार्च २०२३ च्या दुपारी ३.०० वाजल्या पासून ते दिनांक 17 मार्च 2023 च्या रात्री 12.00 पर्यंत होत, ही मुदत वाढवून आता 25 मार्च 2023 च्या रात्री 12.00 पर्यंत करण्यात आलं आहे, शासनाने काढलेल्या आदेशानुसार या तारखे नंतर मुदत वाढ मिळणार नाही यांची नोंद पालकांनी घ्यावी.