वरोरा वणी मार्गावर वरोरा शहराजवळ वणीकडे जात असलेल्या एका कारला भरधाव ट्रकने जबर धडक दिली. या भीषण अपघातात तरुण पती पत्नी डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना आज बुधवारी ( 22 मार्च) ला दुपारी 3 वाजताच्या सुमारास वरोरा शहराजवळ घडली. डॉ. अतुल गौरकार व अश्विनी गौरकार- झाडे (31) असे मृतक डॉक्टरांचे नाव आहे.
आज बुधवारी दुपारचे सुमारास डॉक्टर दाम्पत्य हे स्वतःचे चिमुकल्या बाळाला घरी ठेऊन वरोरा येथे आले होते. दुपारी एम एच 34 ए एम 4240 या क्रमांकाचे कारने वरोरा येथून वणीकडे निघाले असताना दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या एम एच 34- बि झेड 2996 या क्रमांकाचा ट्रकने कारला भिषण धडक दिल. यावेळी पत्नी अश्विनी हिचा जागीच मृत्यू झाला तर पती यावेळी स्थानिक नागरिक धावून आले. त्यांनी लगेच पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन गंभीर जखमींला तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. पत्नी डॉ. अश्विनी गौरकार- झाडे (वय 31) यांचा जागीच मृत्यू झाला तर डॉ. अतुल गौरकार गंभीर जखमी झाले. त्यांना प्राथमिक उपचाराकरिता चंद्रपूरला हलविण्यात आले. भद्रावती जवळ वाटेतच त्यांचा मृत्यु झाला.
पत्नी अश्विनी गौरकार- झाडे ह्या वणी येथे पाच नंबर शाळेजवळ वास्तव्यास होत्या. त्या तीन दिवसापूर्वी येथील ग्रामीण रुग्णालयात कर्तव्यावर रुजू झाल्या होत्या तर पती डॉ. अतुल गौरकार हे वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे कर्तव्य बजावत होते.