कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३ एप्रिलपर्यंत मुदत होती.. बाजार समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची तुफान गर्दी केली. 92 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची चांगलीच गर्दी झाली होती. उमेदवारांनी देखील आपले उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समिती ,मूल जिल्हा चंद्रपूर संचालक मंडळ पंचवार्षीक निवडणूक सन 2022-23 ते 2027-28 दिनांक 27/03/2023 ते 03/04/2023 रोजी पर्यंत एकूण प्राप्त नामनिर्देशनमध्ये गोषवारा मतदार संघाचे नाव प्राप्त नामनिर्देशनाची संख्या
सेवा सहकारी संख्या मतदार संघ 55
ग्रामपंचायत मतदार संघ 28
अडत्ये व व्यापारी मतदार संघ 8
हमाल व व्यापारी मतदार संघ 1 एकूण 92
निवडणूक निर्णय अधिकारी कृषी उत्पनन् बाजार समिती मूल ता मूल जिल्हा चंद्रपूर यांनी कळविले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक निवडणुकीत शेवटच्या दिवशी दूपारी बारा नंतर तहसील कार्यालयात अचानक जनतेची येजा वाढली ,बघता बघता नामांकन पत्र सादर करणाऱ्यांनी विविध प्रमाणपत्रासाठी आपले सेवा केंद्रात गर्दी केली , प्रमाणपत्र जमा करण्यासाठी धावपळ सुरु झाली नामांकनपत्र व्यवस्थित भरणे ,आवश्यक कागदपत्रे सोबत जोडणे यासाठी नवनवीन कार्यकर्ते ,नेतेमंडळींची थोडी धावपळ झाली खरी परंतू तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी इतक्या व्यस्ततेतही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी जे सहकार्य केले ते अद्वितीय असेच होते .या अर्जाची परवा दिनांक ५/०४/२०२३रोजी छाननी होणार असून त्यानंतर दिनांक २०/०४/२०२३ पर्यंत नामांकनपत्र वापस घेण्याची शेवटची तारीख आहे. त्याच दिवशी बोधचिन्ह वाटप होणार असून ९१० मतदार यांचे भाग्य ठरविणार आहेत. दिनांक २८/०४/२०२३ रोजी मतदान आणि ३०/०४/२०२३रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे.