मुल शहरातून वाजत-गाजत निघाली सावरकर गौरव यात्रा@भाजपच्या वतीने गांधी चौकात अभिवादन

391

मूल :स्वातंत्र्य लढ्यातील धगधगते यज्ञकुंड स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सन्मानार्थ आपल्या मूल शहरामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले  होते. यावेळी मान्यवरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ अर्पण करीत त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रे निमित्त स्थानिक गांधी चौकात आयोजित सभेत ना. सुधीर मुनगंटीवार बोलत होते.

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, जि.प.च्या माजी अध्यक्षा संध्या गुरनुले, माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, पं.स.चे माजी सभापती चंदु मारगोनवार, न.प.चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, भाजपा युवती जिल्हाध्यक्ष अल्का आत्राम, प्रशांत समर्थ, चंद्रकांत आष्टणकर आदींच्या उपस्थितीत पार पडलेल्या

देशाच्या स्वातंत्र्यासाठी वीर सावरकरांनी केलेल्या त्यागाचा आदर न करता काँग्रेस त्यांचेसह देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या सर्वधर्मीय महामानवांचा अपमान करते. अश्या देशविरोधी काँग्रेसच्या विसर्जनाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवुन आता कामाला लागा. असे आवाहन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

    सभेत बोलतांना ना. मुनगंटीवार यांनी दाढी वाढवुन पंतप्रधान होता येत नाही तर मेंदु आणि विचारांचा विकासा सोबतच राष्ट्रभावना रुजवावी लागते. असे मत व्यक्त केले. ज्यांच्या इशा-यावर देशात क्रांतीची मशाल पेटली ते सावरकर हजार वर्षे जन्म घेवूनही विदेशात नांव बदलवणा-या राहुल गांधीना होता येणार नाही असे सांगतांना ना. मुनगंटीवार यांनी देशात जाती जाती, धर्मा धर्मात वाद निर्माण करणाऱ्या काँग्रेसला आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. असे मत व्यक्त केले. विधानसभा क्षेत्राचा आमदार म्हणुन काम करतांना क्षेत्राचा भरभरून विकास केला आहे.

गांवागांवात विकासाच्या अनेक योजना पोहोचविल्या आहेत, असे असतांना काँग्रेसची काही मंडळी विकास कामात राजकारण करून आडकाठी आणण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप करतांना ना. मुनगंटीवार यांनी विकासाच्या आड येणाऱ्या प्रत्येकाला धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही. असा सज्जड दमही दिला. राजकारण करायचे तर विकासाचे करा, सेवा आणि मदतीचे करा. निरर्थक आरोप करून लोकशाहीचे हरण करु नका असा सल्लाही ना. सुधीर मुनगंटीवार यांनी बोलतांना दिला.

    सभेपुर्वी स्थानिक चंद्रपूर मार्गावरील इको पाँर्क समोरून गौरव यात्रा काढण्यात आली. यात्रेत क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे आजी माजी सदस्य, भाजपा पदिधिकारी यांचेसह आबाल स्त्री पुरुष मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. याञेचा समारोप स्थानिक गांधी चौकात सभेव्दारा करण्यात आला.गौरव यात्रा निघाली. गौरव यात्रेत पंचक्रोशीतील वीर सावरकर विचारक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.

यात महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. सभेपुर्वी ना. मुनगंटीवार यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला आणि वीर सावरकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. प्रविण मोहुर्ले यांनी संचलन आणि शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर यांनी आभार मानले.