पोलिस स्टेशनमध्ये जप्त करण्यात आलेल्या बेवारस मोटरसायकलींचा होणार लिलाव

204

पोलीस स्टेशन मुल येथे सन २०१६ ते २०२१ पावेतो पोलीस स्टेशन हद्दीत बेवारस स्वरुपात मिळुन आलेल्या एकुण १६ मोटार सायकली ज्यात हिरो होन्डा, सुजुकी, बजाज टिव्हीएस स्कुटी, डिस्कव्हर, स्कुटर, होन्डा, सी.डी. पॅशन, मोपेड, होन्डा शाईन अश्या वर्णनाचे मोटार सायकली बेवारस मिळुन आल्याने सदर मोटार सायकल मालकांनी सदर वाहने परत नेले नसल्याने शासकीय नियमानुसार सदर वाहनांचे लिलाव करण्यात येत आहे.

सदर वाहन लिलावाची दिनांक १७/०४/२०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता पोलीस स्टेशन मुल येथे करण्यात येत आहे. तरी, लिलावाचे वेळी इच्छुकांनी पोलीस स्टेशन मुल येथे वेळेवर हजर येवुन लिलावात सहभाग घ्यावा असे आवाहन पोलीस निरीक्षक श्री सुमित परतेकी, पोलीस स्टेशन मुल यांनी केली आहे.