डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय, मुल हयांच्या वतीने बुधवार – दि. १९/०४/२०२३ ला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, मुल येथे वर्ग १० वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास व आपल्या आवडीनुसार शिक्षणात भविष्य घडवता यावे याकरीता कार्यशाळा व शैक्षणिक मार्गदर्शन चे आयोजन करण्यात आलेले आहे.
कार्यशाळेच्या प्रथम सत्रात दुपारी 3 वाजता कार्यक्रमाचे उद्यघाटन बल्लारपूर नगरपरीषदेचे माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा यांचे शुभहस्ते होणार आहे. प्रमूख अतिथी म्हणून गोंडवाना सैनीकी विद्यालय गडचिरोलीचे उपमुख्यध्यापक ओंमप्रकाश संग्रामे हे लाभाणार आहेत.
व्दितीय सत्रात दुपारी 3.30 वाजता विद्याथ्र्यांचा व्यक्तीमत्व विकास व नवीन शिक्षण प्रणालीचा अभ्यास यावर गडचिरोली येथील प्रा .डाॅ. राकेश चडगुलवार यांचे व्याख्यान होणार आहे.
तृतीय सत्रात दुपारी 4.30 मिनीट वाजता राज्यविज्ञान शिक्षणसंस्था रवि नगर नागपूरच्या प्राध्यापिका मनिषा भडंग यांचे शैक्षर्णिक मार्गदर्शन लाभाणार आहे.
तरी तालुक्यातील विद्याथ्र्यांनी आपले उज्जवल भविष्य घडविण्यासाठी उपस्थित राहावे. असे आवाहन आयोजक प्रविण मोहूर्ले,प्रमोद कोकूलवार,प्रज्योत रामटेके,संजय मारकवार,प्रविण मोहूर्ले चिमढा व जलतरण संघटना मुल यांनी आवाहन केले आहे.