कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या जागांसाठी आज शुक्रवारी सकाळपासून मतदान सुरू झाले आहे. 96.18 टकक्यांपर्यंत मतदान झाले
मूल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत टक्के मतदान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी आज शुक्रवारी सकाळपासून मतदान सुरू झाले आहे. ९६.१८% टकक्यांपर्यंत मतदान झाले आहे.निवडणुकीत एकूण ३० उमेदवार रिंगणात असून ८३८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार होते त्यापैकी ८०६ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. १ मतदान केंद्रातील ३ मतदान बुथवर मतदान प्रक्रिया संपन्न झाली.. सहा वर्षांनंतर ही निवडणूक लागल्याने या निवडणुकीला खूप महत्त्व आले आहे.
या निवडणुकीत सेवा सहकारी सोसायटी, ग्रामपंचायत, आडते -व्यापारी, या तिन गटातील उमेदवार रिंगणात आहेत तर हमाल मापारी संघात एकच नामांकनपत्र दाखल झाल्याने तो उमेदवार अविरोध निवडून आला आहे.मतदान केंद्रावर मतदारांची एकच गर्दी झाली होती. यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विविध पक्षाचे नेतेमंडळींची मतदानकेंद्रावर घाईगडबड सुरु होती.