मूलमध्ये काँग्रेस विरुद्ध काँग्रेस लढतीत @रावत गटाची एकांगी मात

138

मूल: मूल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण १७ उमेदवारांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले.

भाजपने निवडणुकीआधीच सेवा सहकारी मतदारसंघातील सर्व, तर ग्रामपंचायत मतदारसंघातील दोन अर्ज मागे घेतल्याने केवळ ग्रामपंचायत मतदारसंघातून दोन उमेदवार रिंगणात होते,

तर काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर गटातील उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्याने काँग्रेस विरुद्ध काँग्रेस अशीच लढत झाली.

मात्र, या लढतीत काँग्रेस प्रणीत शेतकरी विकास आघाडीने ( रावत गट) एकतर्फी १७ पैकी १७ जागांवर विजय मिळवीत शेतकरी महाविकास आघाडीचा (धानोरकर गट) दारूण पराभव केला.

दोन जागांवर निवडणूक लढविणाऱ्या भाजपाला साधा भोपळाही फोडता आला नाही.

यापूर्वी हमाल मापारी संघातून रमेश बर्डे यांची अविरोध निवड झाली होती. तेदेखील रावत गटाचे उमेदवार आहेत.