मूल शहरात आरोग्य विभाग जिल्हा परिषद, चंद्रपुर व तालुका आरोग्य अधिकारी मूल वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे.
राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रत्येक तालुक्यात आणि शहरी भागात अशा एकूण ५०० ठिकाणी आपला दवाखाना सुरू केले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. या योजनेद्वारे मोफत वैद्यकिय तपासणी, औषधोपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी यांसह प्रकारच्या रक्तचाचण्या सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
मूल येथे महाराष्ट्रदिनी ०१ मे २०२३ पासुन कार्यान्वित झाले आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक तालुक्यात एक या प्रमाणे “हिंन्दुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” नावाने केंद्र स्थापन करण्याचे निर्देश दिले होते.
त्या निर्देशाच्या अनुषंगाने आरोग्य विभाग जिल्हा परिषद, चंद्रपुर व तालुका आरोग्य अधिकारी मूल यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका आरोग्य अधिकारी मूल यांनी ताडाळा रोड, वार्ड नं ११, येथे हिंन्दुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे लोकापर्ण दि. ०१ मे. २०२३ रोज सोमवारला सकाळी १०.०० वाजता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते ऑनलाईन डिजीटल प्रणालीद्वारे लोकार्पण करुन सुरु करण्याचे ठरविले होते. करीता सदर कार्यक्रमास समस्त जनतेने उपस्थित राहावे ही विनंती करण्यात आली होती.मूल भागातील जनसामान्य, गोरगरीब, झोपडपट्टी भागात राहणा-या नागरीकांसाठी १५ वा वित आयोग अंतर्गत येथील जनतेला गावातच आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशाने सदर आपला दवाखाना सुरु करण्यात आला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रावर मिळणा-या आरोग्य सेवाप्रमाणेच ( काही सेवा वगळता ) सुविधा देण्यात येतील, जसे रोगनिदान व उपचार, गरोदर माता व बालक तपासणी, बालकांचे लसिकरण संशयित क्षयरोग व कुष्ठरोग तपासणी, रक्त नमुणे घेणे इत्यादी सेवा पुरविण्यात येतील. स्थानिक पातळीवरील कार्यक्रमात तहसीलदार डॉ. रविंद्र होळी यांनी फित कापून औपचारिक उद्घाटन केले यावेळी नगरपरिषद मूलचे मुख्याधिकारी अजय पाटणकर , तालुका आरोग्य अधिकारी डॉ.समीर थेरे,उपजिल्हारुग्णालय मूल चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवेंद्र लाडे,ठाणेदार सुमित परतेकी उपपोलिस निरीक्षक बंसोड ,नायब तहसीलदार ओंकार ठाकरे,यशवंत पवार , प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी समस्त जनतेनी हिंन्दुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यामध्ये येऊन आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी अजय पाटणकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समिर थेरे,वैद्यकीय अधिक्षक डॉ. देवेंद्र लाडे व मान्यवरांनी केले.यावेळी कार्यक्रमाला आरोग्य कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
Post Views: 153