निकाल लागण्यापूर्वीच, कांतापेठ येथील जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांनी पालकांची समंती घेताच, परस्पर विद्यार्थीनीचे शाळा सोडल्यांचे दाखले स्वत:च्या मर्जीनेच चिरोलीच्या शाळेत दिल्यांने, संतप्त पालकांनी कांतापेठ शाळेत आज गोंधळ घातला. मुख्य म्हणजे काल बुध्द पोर्णिमेची सार्वजनिक सुट्टी असतांना, कालच त्यांनी आजच्या तारखा टाकून टि.सी. दिल्यांने यात आर्थिक व्यवहार झाल्यांचा आरोप पालकांनी मूल पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला असून, पालकांनी मुख्याध्यापकांच्या कक्षात घातलेला गोंधळाचे व्हिडीओ समाजमाध्यमात चांगलेच वायरल होत आहे.
शासकीय शाळेत, अनुदानीत शाळेत विद्यार्थाची संख्या कमी असल्यांने, पाचवीच्या विद्यार्थासांठी चढाओढ आहे. आपल्याला पाचवीचे विद्यार्थी मिळावे यासाठी प्रत्येक शिक्षक जिल्हा परिषद शाळेत संपर्क साधत असून, जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकांना आर्थिक प्रलोभने दाखविली जात आहे. असाच आर्थिक लाभ मिळविण्यांकरीता कांतापेठ येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कुमरे यांनी, शाळेचा निकाल लागण्यापूर्वीच सुट्टीचे एक दिवस आधीच सर्व विद्यार्थाच्या टिसी चिरोलीच्या शाळेत परस्पर दिल्यांचे उघड झाले आहे.
शासनाचे निर्णयानुसार, 6 मे रोजी निकाल जाहीर करण्यांचे आदेश होते. यानुसार विद्यार्थी आज निकाल घेण्याकरीता कांतापेठ शाळेत गेले असता, वर्गशिक्षीकेने अजुन निकाल तयार व्हायचे असल्यांचे सांगीतले, मात्र मुख्याध्यापकांनी तुमच्या टिसी चिरोलीच्या शाळेत दिल्यांचे सांगताच, पालकांनी शाळेत धाव घेत आमच्या समंतीशिवाय टिसी कशी दिली? असा संतप्त सवाल केला.
याबाबत आमचे प्रतिनिधीने मुख्याध्यापक कुमरे यांचेशी संपर्क साधला असता, ‘होय, मी आजची तारीख टाकून, कालच टिसी दिली, हा माझा अधिकार आहे, कोण काय करते,ते मी पाहून घेईल’ असे उर्मट उत्तर दिले.
पालकांचे तक्रारीनुसार गटशिक्षणाधिकारी यांचेशी संपर्क साधला असता, मुख्याध्यापक यांची कृती गंभीर असून, कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया दिली.
मिळालेल्या विश्वसनीय माहीतीनुसार, चिरोलीच्या शाळा व्यवस्थापनाकडून मुख्याध्यापक कुमरे यांना प्रति टिसी पाच हजार रूपये दिल्याची परिसरात चर्चा असून, या प्रकरणाच्या तक्रारीवर गटशिक्षणाधिकारी कोणती कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.