मूल तालुक्यातील कोसंबी गाव मूल शहरापासून अवघ्या २-३किलोमीटर अंतरावर आहे ,या गावात आज दूपारी ३-३.३०च्या दरम्यान शेतशिवारात अस्वल आढळून आल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण असून या अस्वलीचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.कोसंबी परिसरातील शेतशिवारात भ्रमंती करणाऱ्या अस्वलीचा व्हिडीओ समाजमाध्यमावर धुमाकूळ घालत असल्याने नागरिकांना उत्सुकता निर्माण झाली आहे.
अस्वलीचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली…..दि. 07/05/२०२23 रविवार ला आज च्या दूपारी ३-३.३०च्यावाजताच्या सुमारास या भागात नागरिकांना ही अस्वल दिसल्याने या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. या अस्वलीने फेरी मारून आसपास आश्रय घेतला. ही घटना समजताच मोठ्या संख्येने बघ्यांची गर्दी या भागात एकत्र झाली. या परिसराच्या लगेच झुडपे असून उत्तम अधिवास असल्याने याच भागातून अस्वल खाद्याच्या शोधार्थ शेतामध्ये आली असावी , असा कयास आहे.दरम्यान, अस्वलीच्या शोधासाठी वनविभागाने आपली शक्ती पणाला लावली असून स्थानिक नागरिक यांना मदत करत आहेत.
Post Views: 108