पीएम किसान सन्मान निधी : १५ मे पर्यंत आधार लिंकिंग@प्रति वर्ष सहा हजार रुपये

83

शेतकऱ्यांनो, दोन हजारांचा हप्ता हवाय ? बँक खात्याला आधार!
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना १ डिसेंबर २०१८ पासून सुरू झाली. वर्षाला दोन हजारांचा हप्ता हवा असेल, तर येत्या १५ मे २०२३ पर्यंत  बँक खात्याला आधार लिंकिंग बंधनकारक करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ( पीएम किसान) योजनेंतर्गत केंद्र शासनाने निकष शिथिल केल्याने लाभार्थी शेतकरी कुटुंबांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शेतकरी कुटुंबासाठी दोन हेक्टरची मर्यादा रद्द केल्याने सरसकट शेतकरी कुटुंबे योजनेसाठी पात्र ठरली आहेत. अट शिथिल केल्यामुळे राज्यातील सव्वा कोटी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात •आली. त्यानुसार पुढील कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
१७ मेपर्यंतची मुदत
शेतकऱ्यांना महसूल अधिकारी किंवा नोडल ऑफिसर यांच्याशी संपर्क साधावा लागतो. सामान्य सेवा केंद्रांनादेखील नाममात्र शुल्क भरून या योजनेसाठी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी अधिकृत केले आहे. १५
मे २०२३ पर्यंत बँक खाते आधार लिंक करावे लागणार आहे.
 वेबसाईटवर किसानकॉर्नर’
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ‘किसान कॉर्नर’ नावाचा विभाग आहे. शेतकरी पोर्टलवर किसान कॉर्नरद्वारे स्वतःची नोंदणी करु शकतात. तसेच पीएम- किसान  डेटाबेसमध्ये बदल देखील करु  शकतात आणि त्यांच्या पेमेंटची स्थिती जाणून घेऊ शकतात.
प्रति वर्ष सहा हजार रुपये
लहान व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना किमान उत्पन्न समर्थन म्हणून प्रति वर्ष सहा हजार रुपये दिले जातात. देशभरातील सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये प्रतिवर्ष सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. योजनेनुसार पती, पत्नी आणि अल्पवयीन मुलांची गणना शेतकरी कुटुंबात केली जाते. यात २ हजार रुपये थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केले जाते.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आपले बँक खाते आधारशी जोडावे लागणार आहे.