मूल : तालुक्यातील भवराळा येथील रहिवासी विवाहितेने गळफास घेत आपले जीवन संपविले. सदर घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली.
नम्रता प्रकाश नागपुरे वय वर्ष 24 असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
तिला शौर्य प्रकाश नागापुरे 5 वर्ष आणि
मुलगी सोनी प्रकाश नागपुरी 4 वर्ष असे अपत्य असून
सदर आत्महत्या केलेल्या विवाहितेचे पती अवैध दारू व्यवसायी असून कौटुंबिक कलहातून नम्रताने आत्महत्या चे पाऊल उचलल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे
नम्रताची दोन्ही मुले लहान असल्याने तिच्या या निर्णयाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम राठोड करीत आहेत.
Post Views: 127