अनेक वर्षापासून रेंगाळत असलेला नागरिकांच्या रस्त्याचा प्रश्न अखेर निकाली. (पोलिस बंदोबस्तात जेसीबीने अतिक्रमणं काढले)

129

मूल – नगर परिषद मूलअंतर्गत येणाऱ्या वॉर्ड नं. १२ मधील सर्व्हे नंबर ९५३ व ९३८ या जागेतून चार मीटर रुंदी व ३५ मीटर पूर्व- पश्चिम लांबीचा रस्ता सार्वजनिक असून त्यावर साहित्य टाकून अतिक्रमण केले होते. त्यामुळे मागील भागात राहणाऱ्या नागरिकांना जाण्यासाठी रस्ताच नव्हता. पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना पाण्यातून चिखलातून जावे लागत होते.

याबाबत वॉर्डातील नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाकडे विनंती केली,याबाबत सतत पाठपुरावा केला. याची गंभीर दखल घेऊन नगर परिषद प्रशासनाने रीतसर वर्तमानपत्रात निविदा देऊन मंजूर करून घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अर्धा रस्ता तयार करण्यात आला.

पूर्ण रस्ता न केल्याने नाहक त्रास सहन करावा लागत होते. यात एका ठिकाणी सामान असल्याने काम अडले होते. ते त्वरित हटवून रस्ता करून देण्याची मागणी पुन्हा नागरिकांनी सारखी लाऊन धरली.
नगर परिषद मूल अंतर्गत विश्रामगृहाजवळ स.नं. ९५३ व ९३८ मधून सार्वजनिक रस्ता होण्याची मागणी गेल्या २० ते २५ वर्षांपासून वॉर्डातील अनेक नागरिक करीत असून . नगर परिषद मूल प्रशासनाकडे वारंवार निवेदन देऊन रस्ता करण्याची मागणी तथा विनंती करण्यात आली.

मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. त्यामुळे मागील वर्षी नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने अर्धा रस्ता तयार करण्यात आला. मात्र विश्रामगृहाकडे जाणारा रस्ता तयार करण्यास अडथळे निर्माण झाल्याने नगर परिषदेने वर्तमानपत्रात जाहीर निविदा देऊन रस्त्याची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला.

हा रस्ता तयार करण्यास सर्व बाबी अनुकूल असताना नगर परिषद प्रशासन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वारंवार मागणी केल्यानंतर या रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली. असे असताना बांधकाम विभागाने केवळ अर्धवट रस्ता करून ठेवल्याने जनतेला याचा त्रासच सहन करावा लागत आहे. याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष पुरविण्याची मागणी वॉर्डवासीयांनी सुद्धा केली होती.त्यामुळे विश्रामगृहाजवळील वॉर्ड नं. १२ मधील रस्त्याचा प्रश्न मार्गी
लागला असून त्या जागेवर सामान टाकून ठेवल्याने संबंधित जागा मालकाला हटविण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे येत्या आठ दिवसांत रस्ता तयार करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. असे मत न.प. मुख्याधिकारी अतुल पाटणकर यांनी नागरिकांना देऊन त्यांचे समाधान केले. अखेर दिनांक ८ मे २०२३ रोजी नगर परिषद प्रशासन मुख्याधिकारी अजय पाटणकर यांचे नेतृत्वात अडवणूक केलेल्या चार मीटरच्या रस्त्यावरील अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात जेसीबीने काढून रस्त्यासाठी कितेक वर्षापासून झटणाऱ्या वॉर्डातील नागरिकांना नगर परिषद प्रशासनाने दिलासा दिला. ही कारवाई मुख्याधिकारी अजय पाटणकर यांचे मार्गदर्शनात जे.ई.समर्थ, बांधकाम विभागाचे राजू पुद्दटवार ,आरोग्य विभाग प्रमुख अभय चेपुरवार उपस्थित होते.

माजी अध्यक्षा सौ.रत्नामला प्रभाकर भोयर ,माजी उपाध्यक्ष नंदूजी रणदिवे, मुल नगर प्रशासनाचा यांचे नागरीकांनी खुप खुप आभार व्यक्त केला.