मुल येथील शासकीय कार्यालय स्थाणांतरणासाठी निवेदन

116

भव्यदिव्य प्रशासकीय भवन परिसरात दुय्यम निबंधक कार्यालय व तालुका कृषी अधिकारी कार्यालय ही दोन्ही कार्यालये स्थलांतरीत केली गेल्यास जनतेला दुय्यम निबंधक कार्यालयास आवश्यक ती कागदपत्रे तहसील कार्यालयातून घेऊन त्यांची पूर्तता करणे ,मुद्रांक विक्रेत्यांना मुद्रांक पेपर विक्री करणे, आनलाईन नोंदणी करणे , मुद्रांक पेपर विकत घेणे ,दस्त नोंदणी करणे, आवश्यक मुद्रांक शुल्कासह दस्तावेज तयार करणे ही सारी प्रक्रिया अधिक सुलभतेने आणि जलदगतीने करता येणार आहे . शासकीय कार्यालये स्थानांतरण संघर्ष समितीने आज या कार्यालयाला भेट दिली असता दुय्यम निबंधक दोनतीन ठिकाणचा प्रभार एकाच वेळी सांभाळत असल्याने कधी आज इकडे तर कधी तिकडे हजेरी लावतात, त्यामुळे साहजिकच आठवड्यात उपलब्ध दिवशी गर्दी केली जाते आणि जनतेला नाहक त्रास आणि येरझाऱ्या तर होतातच परंतू कार्यालयात येणाऱ्यांना बसण्याची तर सोडाच साधे उभे राहण्याची व्यवस्था नाही, व उन्हापावसापासून बचावासाठी साधे शेड नाही, मुद्रांक खरेदीसाठी तहसील कार्यालयात पायपीट करत जावे लागते , पिण्याच्या पाण्याची सोय नाही. तासनतास उघड्यावर वाट बघत बसणाऱ्यांना साधी मुत्रीघराची सोय नाही. अशा असुविधा असताना हे कार्यालय स्थलांतरित कां करण्यात येत नाही ,हे समजून घ्यायला हवे हा विचार करून दुय्यम निबंधक यांना निवेदन सादर करुन चर्चा केली असता नोंदणी करणे साठी महिला व वयस्कर लोकही या कार्यालयात येत असतात अशावेळी त्यांना सोयिस्कर व्हावे यासाठी तळमजल्यावरील दालन आवंटित केल्या गेले तर आम्ही तातडीने हे कार्यालय स्थानांतरित करण्यासाठी तयार आहोत ,आमच्या कडे अपूरा कर्मचारी वर्ग आहे तरीही आम्ही काम करतोय असेही मूलच्या दुय्यम निबंधक यांनी स्पष्ट केले.

तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संघर्ष समितीने भेट दिली असता इथेही तालुका कृषी अधिकारी दोन ठिकाणचा प्रभार सांभाळत असल्याचे कळले, परिणामी ते कधी इकडे तर कधी तिकडे असतात , आज त्यांचेशी संघर्ष समितीचे वतीने स्थानांतरण या विषयावर चर्चा केली असता कार्यालयाला २०००चौरस फूट व गोडाऊन साठी १०००चौरस फूट जागेची आवश्यकता असून एवढी जागा प्रशासकीय भवनात उपलब्ध होऊ शकणार नाही या एका शक्यतेपोटी तालुका कृषी कार्यालय प्रशासकीय भवनात स्थानांतरित केले गेले नाही असे स्पष्टीकरण भास्कर गायकवाड तालुका कृषी अधिकारी यांनी उत्तरादाखल स्पष्टपणे बोलून दाखवले ,आणि एवढी सोय होणार असेल तर आम्हाला कार्यालय स्थानांतरणासाठी कोणतीही अडचण नाही हेही स्पष्ट केले.

आज या दोन्ही कार्यालयात संघर्ष समितीचे वतीने भेट देऊन निवेदन सादर करून चर्चा केली असता ,दीपक देशपांडे, प्रकाश चलाख , राजू गेडाम ,प्रमोद मशाखेत्री ,अमित राऊत , नरेश वैद्य ,वासुदेव चौखुंडे ,दादाजी येरणे यांचेसह इतर शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

त्यामुळे दुय्यम निबंधक व तालुका कृषी अधिकारी कार्यालय प्रशासकीय भवनात स्थलांतरित झाल्यास ,दस्ताऐवज तयार करणे ,बदलणे व शेतकऱ्यांना शेती संबंधित कामे तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अथवा पं.स. कृषी विभागातील कामे समोरासमोर झटपट करता येतील यासाठी तालुका प्रशासन ,दुय्यम निबंधक कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय व शासकीय कार्यालये स्थानांतरण संघर्ष समिती मूल यांनी एकत्र बसून तोडगा काढण्यासाठी तातडीने बैठक आयोजित करून अंतिम तोडगा काढला जाणे शक्य आहे.

सत्ताधारी व संबंधित विभाग या बाबतीत गंभीरपणे विचार करून योग्य तो निर्णय घेऊन तातडीने अंमलबजावणी करतील अशी आशा जनता व्यक्त करीत आहे , मात्र ही प्रक्रिया शासनस्तरावर पूर्ण करण्यासाठी कार्यक्रम निश्चीत करण्यात येणार आहे असे शासकीय कार्यालय स्थलांतरण संघर्ष समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.