एमएचटी सीईटी २०२३ अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी तंत्रज्ञान या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरीता

81

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई या कक्षामार्फत अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी तंत्रज्ञान या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरीता एमएचटी सीईटी २०२३ ही सामाईक प्रवेश परीक्षा पीसीएम ग्रुप दिनांक ०९/०५/२०२३ ते १४/०५/२०२३ व पीसीबी ग्रुप १५/०५/२०२३ ते २०/०५/२०२३ या कालावधीत घेण्यात येणार आहे.
एमएचटी सीईटी २०२३ (पीसीएम ग्रुप) चे प्रवेश पत्र ( Admit Card) उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आलेले असून उमेदवारांनी प्रवेश पत्र अभ्यासक्रमाच्या संकेतस्थळावरुन डाउनलोड करुन त्याची प्रिंट आऊट काढावी. प्रवेश पत्रा वरील परीक्षेचा दिनांक, परीक्षेची वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता इत्यादी काळजीपूर्वक वाचावे. परीक्षेच्या दिवशी प्रवेश पत्रावर नमूद केलेल्या परीक्षा केंद्राचे मुख्यद्वार बंद होणेच्या वेळेपुर्वी पोहोचण्यासाठी योग्य ते नियोजन करावे. परीक्षेस जाताना प्रवेश पत्र सोबत घेवुन जावे. परीक्षेस जाताना उमेदवाराने त्याचबरोबर आपली ओळख दर्शविणारी प्रवेश पत्रामध्ये नमुद ओळखपत्रे जसे की, पॅनकार्ड, आधारकार्ड, पासपोर्ट इत्यादी सोबत ठेवावीत. दिव्यांग उमेदवारांनी (PWD Candidates ) त्यांच्या अपंगत्वाबातचे मुळ ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. प्रवेश पत्रावरील सुचनांचे वाचन करुन त्याप्रमाणे पालन करावे.
एमएचटी सीईटी २०२३ (पीसीबी ग्रुप) चे प्रवेश पत्र उमेदवारांना दिनांक १० मे, २०२३ पासून उपलब्ध करुन देण्यात येईल.
सर्व उमेदवारांना परीक्षेतील यशासाठी मन:पूर्वक शुभेच्छा !