महाडीबीटीवर शेतकरी योजनेंतर्गत प्रमाणित बियाण्यांचा लाभ

93
चंद्रपूर दि. 16 मे : राज्य शासनाच्या ‘महाडीबीटी’ पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ अंतर्गत प्रमाणित बियाण्यांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात अन्नसुरक्षा आणि पोषण अभियान व राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत प्रात्याक्षिके व प्रमाणित बियाणे वितरण या बाबींचा लाभ देण्यात येणार असून यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा.
अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.