बीएस्सी नर्सिंग सीईटीसाठी आजपासून अर्ज करता येणार

69

बीएस्सी नर्सिंग हेल्थ सायन्स अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएच बीएस्सी नर्सिंग सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी उद्या 17 मेपासून ऑनलाईन नोंदणी व परीक्षा अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.

अर्ज भरण्याची प्रक्रिया 26 मेपर्यंत सुरू राहणार असून 27 मेपर्यंत परीक्षा शुल्क भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी वेबसाईटवर संपर्क साधावा, असे आवाहन सीईटी सेलचे संचालक महेंद्र वारभुवन यांनी केले आहे.