मोठी बातमी ! बारावीचा निकाल आज दुपारी दोन वाजता जाहीर होणार

53

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. बारावीचा निकाल आज म्हणजेच २५ मे रोजी लागणार आहे.

दुपारी दोन वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार आहे.

या वेबसाईटवर पाहता येणार निकाल
mahresult.nic.in

https://hsc.mahresults.org.in
https://hscresult.mkcl.org

पुणे बोर्डाच्या माध्यमातून फेब्रुवारी मार्च महिन्यात दहावी बारावीची परीक्षा झाली होती. कोरोनानंतरची ही पहिलीची परीक्षा होती म्हणून यावेळी कॉपीमुक्त नांदेड पॅटर्न राबवण्यात आला होता. त्यामुळे कापी हा प्रकार कमी झाल्याचे पाहायला मिळाले. परीक्षा संपल्यानंतर शिक्षकांनीही योग्य वेळेत उत्तर पत्रिकांची तपासणी केली. यामुळे आता उद्या म्हणजेच २५ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.