चंद्रपूर दि. 24 : सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे घेण्यात येणारी शासकिय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी.अॅण्ड ए.) परिक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा दि. 26, 27 व 28 मे, 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 व दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत भवानजीभाई हायस्कुल, मुल रोड, चंद्रपूर येथे घेण्यात येणार आहे.
ज्या परीक्षार्थीनी 2023 च्या परीक्षेकरीता अर्ज केले आहेत, अशा परीक्षार्थीनी आपले ओळखपत्र युजर आयडीवापरुन संकेतस्थळावरुन काढुन घ्यावे. तसेच ज्या परीक्षार्थीचे ओळखपत्र मिळाले नाहीत अशा परीक्षार्थीनी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, निवडणुक ओळखपत्र, वाहन परवाना, कार्यालयाचे ओळखपत्र दाखवून प्रोव्हिजनल ओळखपत्र या कार्यालयाकडून दि. 25 मे 2023 पर्यंत बनवुन घेण्यात यावे. असे जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे यांनी कळविले आहे.