‘महाज्योती’ कडून प्रशिक्षण; १० हजारांचे विद्यावेतन@२८ मे पर्यंत अर्जांची मुदत

84

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती कडून इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना २०२३-२४ या वर्षात मिलिटरी भरतीच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे ७५ टक्के उपस्थिती असल्यास १० हजार रुपये विद्यावेतनही दिले जाणार आहे, 
६ महिने प्रशिक्षणाचा कालावधी
१० हजार रुपये
विद्यावेतन
१२ हजार (एकवेळ)
आकस्मिक निधी
प्रशिक्षणाकरिता आवश्यक पात्रता
‘महाज्योती कडून देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणासाठी अर्ज करणारा विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, तो नॉन क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असणे आवश्यक आहे. १२ वीत प्रविष्ट किंवा उत्तीर्ण असायला हवा. त्याची अंतिम निवड छाननी परीक्षेद्वारे होणार आहे. वयोमर्यादा १७ व कमाल २१ आहे.
प्रशिक्षणासाठी अनिवार्य वैद्यकीय मानके
उमेदवाराचे शरीर मजबूत आणि मानसिक आरोग्य सुस्थितीत असावे, छातीचा विकास किमान ५ सें.मी. विस्तारित असावा, कानांनी सामान्य ऐकणे व दोन्ही डोळ्यांनी व्यवस्थित दिसता येणे आवश्यक.
वैद्यकीय पात्रताही
आवश्यक
उंची किमान १५७ सें. मी. (पुरुष)
किमान १५२ सें. मी. (महिला)
छाती ७७ सें. मी. (केवळ पुरुष)
२८ मे पर्यंत अर्जांची मुदत ‘महाज्योती’कडून दिल्या जाणा
मोफत स्वरूपातील प्रशिक्षणासाठी उमेदवारांना २८ मे पर्यंत अधिकृत
वेबसाईटवर अर्ज करता येणार आहे.
महाराष्ट्रातून पात्रता सिद्ध करणाऱ्या १५०० उमेदवारांची त्यासाठी निवड
केली जाणार आहे