बारावीचा निकाल कालच जाहीर झाला. तंत्रनिकेतन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाल्या असून विद्यार्थी तयारी लागले आहेत. त्यासाठी विविध दाखले व प्रमाणपत्रांची गरज भासते. ही प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी अडचणी येऊ नये, याकरिता आवश्यक कागदपत्रे कोणती, प्रक्रिया कशी चालते, याची माहिती
पि.एम.डीटीटल न्यूज ने विद्यार्थी आणि पालकांना उपलब्ध करून देत आहेत.
उत्पन्नाचा दाखला आवश्यक कागदपत्रे १) उत्पन्नाचा तलाठ्यांचा दाखला, शहरातील असल्यास तलाठी कार्यालयातील उत्पन्नाचा दाखला २) नोकरी असल्यास (आयकर विवरणपत्र) ३) शेती असल्यास (सातबारा) (४) रेशनकार्ड, आधारकार्ड आणि एक छायाचित्र या दाखल्यासाठी महा ई-सेवा केंद्रात अर्ज करावा. हा दाखला मिळविण्यासाठ शासनाने १५ दिवसांची मुदत दिली आहे.
शेतकरी, डोंगरी दाखल्यासाठीची कागदपत्रे वैद्यकीय शिक्षणासाठी शेतकरी दाखला आणि डोंगरी दाखला, तर कृषी शिक्षणासाठी शेतकरी दाखला लागतो.
शेतकरी दाखल्यासाठी सातबारा, ८-अ उतारा, रेशनकार्ड, आधारकार्ड, मंडळ अधिकारी अहवाल (पीक कोणते, शेती अथवा पडीक जमीन, आदींबाबतची माहिती), ऑफिडेव्हिट लागते.
डोंगरी दाखल्यासाठी डोमेसिअलप्रमाणे कागदपत्रे लागतात. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील लाभार्थी या दाखल्याचा लाभ घेऊ शकतात. या दाखल्यासाठी लाभार्थी हा पूर्णपणे त्या तालुक्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
या दोन्ही दाखल्यांसाठी अर्जदाराचे एक छायाचित्र लागते. कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र मिळतो.
नॉन-क्रिमिलेयर सर्टिफिकेट (उच्च उत्पन्न गटात नसल्याबाबतचा दाखला) आवश्यक कागदपत्रे (१) जातीचा दाखला २) आठ लाखांच्या आतील उत्पन्नाचा तहसीलदारांचा दाखला ३) शाळा सोडल्याचा दाखला ४) रेशनकार्ड, आधारकार्ड आणि एक छायाचित्र या दाखल्यासाठी महा ई-सेवा केंद्रात अर्ज करावा. हा दाखला मिळविण्यासाठी १५ दिवसांची मुदत आहे.
डोमिसिअल ( वय, अधिवास आणि राष्ट्रीयत्वाचा दाखला) १) मूळ महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक २) शाळा सोडल्याचा दाखला ३) १५ वर्षांचा रहिवास सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (वीज बिल. असेसमेंट उतारा, सातबारा, आदी) ४) रेशनकार्ड, आधारकार्ड आणि एक छायाचित्र. या दाखल्यासाठी महा ई-सेवा केंद्राकडे अर्ज करावा. संबंधित दाखल मिळण्याची मुदत १५ दिवस आहे.
जातीचा दाखला (ओबीसी, मराठा प्रवर्ग) आवश्यक कागदपत्रे : १) घराण्यातील ज्याचा सन १९६७ पूर्वी जन्म झाला आहे. त्या व्यक्तीचा जातीचा पुराव्यासहित एक कागदपत्र पुरावा म्हणून द्यावे. (उदाहरणार्थ: शाळेचा दाखला, तहसील कार्यालयातील जन्म नोंदी) रक्तनात्यातील वंशावळ सिद्ध करणारे पुरावे. २) सन १९६७ पूर्वीचा रहिवासाबाबतचा महसूल पुरावा. (उदा. १९६७ पूर्वीचा सातबारा उतारा अथवा ग्रामपंचायतीकडून मिळणारे घरठाण पत्रक (असेसमेंट उतारा). ३) रेशनकार्ड, आधारकार्ड आणि एक छायाचित्र. विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती (एसबीसी, व्हीजेएनटी) १) घराण्यातील ज्याचा सन १९६१ पूर्वी जन्म झाला आहे. त्या व्यक्तीचा जातीचा पुराव्यासहित एक कागदपत्र पुरावा म्हणून द्यावे. (उदाहरणार्थ : शाळेचा दाखला, तहसील कार्यालयातील जन्म नोंदी) रक्तनात्यातील वंशावळ सिद्ध करणारे पुरावे. २) सन १९६१ पूर्वीचा रहिवासाबाबतचा महसूल पुरावा. (उदा. १९६१ पूर्वीचा सातबारा उतारा अथवा ग्रामपंचायतकडून मिळणारे घरठाण पत्रक (असेसमेंट उतारा). ३) रेशनकार्ड, आधारकार्ड आणि एक छायाचित्र. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (एस.सी., एस.टी.) १) घराण्यातील ज्याचा सन १९५० पूर्वी जन्म झाला आहे. त्या व्यक्तीचा जातीच्या पुराव्यासहित एक कागदपत्र पुरावा म्हणून द्यावा. (उदाहरणार्थ: शाळेचा दाखला, तहसील कार्यालयातील जन्म नोंदी) रक्तनात्यातील वंशावळ सिद्ध करणारे पुरावे. २) सन १९५० पूर्वीचा रहिवासाबाबतचा महसूल पुरावा. (उदा. १९५० पूर्वीचा सातबारा उतारा अथवा ग्रामपंचायतकडून मिळणारे घरठाण पत्रक (असेसमेंट उतारा). ३) रेशनकार्ड, आधारकार्ड आणि एक छायाचित्र.
या दाखल्यांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सन १९६७, १९६१ आणि १९५० ही वर्ष मानीव दिनांक पुरावा ग्राह्य धरले आहेत. या दिनांकांपूर्वी जो रहिवास पुरावा असेल. त्या संबंधित तहसील कार्यालयातील महा ई-सेवा केंद्रात अर्ज जमा करावा. (उदा. सातबारा अथवा घरठाण पत्रक जर, दुसऱ्या तालुक्यातील असेल आणि सध्या अर्जदार हा मुल ला राहत असेल, तर अर्जदाराला सातबारा अथवा घरठाण पत्रक असलेल्या तालुक्यात अर्ज करावा लागतो.)
हा दाखला मिळण्याची मुल ला मुदत ४५ दिवसांची, तर संपूर्ण राज्यात १५ दिवसांची मुदत आहे. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर संबंधित नायब तहसीलदार, तहसीलदार, प्रांत कार्यालयातील कार्यवाही पूर्ण केल्या जाते. त्यानंतर अर्जाची पडताळणी होऊन डिजिटल स्वाक्षरी झाल्यानंतर महा ई-सेवा केंद्रातून जातीचा अर्जदाराला दाखला मिळतो.
या दाखल्यासाठी लागते प्रतिज्ञापत्र जातीचा दाखला आणि नॉन- क्रिमिलेयर सर्टिफिकेटसाठी प्रतिज्ञापत्र (ऑफिडेव्हिट). तर उत्पन्नाचा दाखला आणि डोमिसिअलसाठी स्वः घोषणापत्र (सेल्फ
आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्राचे नावEWS 10% सर्टिफिकेट फॉर महाराष्ट्र गव्हर्नमें