शहरासह तालुक्यातील शनिवारची रात्रौ 9 ते 12 च्या सुमारास विजेच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह पाऊस सुसाट वारा सुटला असता रात्रौ 9 ते 12वाजेच्या सुमारास सर्वत्र काळोख पसरला होता. यामुळे लोकांची तारांबळ उडाली.बहुतांश भागात हलका आणि मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात दोन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे.
तालुक्यांत चक दुगाळा शेत शिवारात विजेच्या कडकडाटसह जोरदार पाऊस झाला. काही भागातही पावसाने हजेरी लावली. या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तसेच इतर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. बहुतांश भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने विविध भागातील वीज पुरवठाही खंडित झाला होता. वादळी पावसाने छप्परे उडाली, आर्थिक नुकसान, विज पुरवठा खंडीत मूल काल अचानक सायंकाळपासून गार वाऱ्यासह वादळी पावसाने हजेरी लावली. यात मूल तालुक्यातील चक दुगाळा येथिल घनश्याम पत्रुजी वाळके यांच्या घराची छप्पर, गोठा आणि दुगाळा माल या गावातील बैलाच्या गोठ्यांची छपरे उडाली. यात घर मालकाचे, शेतकरी चे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घरांचे छपरे उडाल्याने घरमालक विवंचनेत पडला आहे. शासनाने आर्थिक मदत करण्याची मागणी होत आहे.छप्परे उडाल्याने गोठ्यात असलेल्या बैलाचे जीव थोडक्यात बचावले. गोठ्यात असलेले लाईट व पंखा तुटून पडले. ही घटना काल रात्र आठ ते नऊच्या दरम्यान घडली.काल अचानक सायंकाळी सात वाजता पासून वादळ वारा सुरू झाला आणि अचानक पाऊसही पडला. विजेचे खांब तुटून पडले आहेत, त्यामुळे कालपासून दुगाळा माल आणि चक दुगाळा या दोन्ही गावातील वीज खंडित झाली आहे. दोन्ही गावांना अंधारात रात्र काढावी लागली. वीज परवठा सरू नसल्याने गाव वासीयांना आजही अंधारातच रात्र काढावी लागणार असल्याचे गावकऱ्यांनी विज वितरण च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम करून गाव वासियांना अंधारातून मुक्त करावे अशी मागणी केली आहे.