राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाचे निर्देशानुसार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती दिनी ग्राम पंचायत चिखली (ता.मुल) तर्फे गावातील दोन कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला.
ग्राम पंचायत उपसरपंच प्रा.दुर्वास कडस्कर सौ साधनाताई मडावी सदस्या प्रीतीताई चिमुरकर ग्रामविकास अधिकारी यांच्या हस्ते शाल, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन , सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल महिला बचतगटांच्या सदस्य तथा पेसा मोबिलायझर सौ. संगीता आनंद मंडलवार, आशा वर्कर सौ.कल्पना येरमे यांचा सत्कार करण्यात आला.
राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. उपसरपंच दुर्वास कडस्कर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला सौ.वनिता मुनगटे पौर्णिमा कोल्हटवार सौ. लक्ष्मी मडावी, सौ.सिडाम, ग्राम पंचायत शिपाई धनराज कडस्कर यांची विशेष उपस्थिती होती. .
Home आपला जिल्हा Breaking News अहिल्याबाई होळकर जयंती दिनी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार@ग्रामपंचायत चिखली चा पुढाकार