निशा धोंगडे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित

48

देवाळा गट ग्रामपंचायत अंतर्गत सन २०२३-२०२४ सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल महिला व बालकल्याण विकास महाराष्ट्र शासन चंद्रपूर च्या विद्यमाने देवळा ग्रामपंचायत च्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार या सन्मानाने निशा धोंगडे यांना सन्मानित करण्यात आले.

सौ. निशाताई धोंगडे सन्मानित पुरस्काराबद्दल बोलतांना म्हणतात की, पुरस्काराच्या मी नव्हे तर माझ्या आईतुल्य असलेल्या सासूबाई खऱ्या सन्मानाच्या मानकरी आहेत. त्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहिल्यामुळे आणि वेळोवेळी सून म्हणून नव्हें तर मुलीच्या वात्सल्यभावनेतून सहकार्याची भूमिका घेत परिवाराकडे कटाक्षाने लक्ष दिल्यामुळे मला आणि परिवाराला कश्याचीही उणीव भासू दिली नसल्यामुळे त्याच खऱ्या सन्मानाच्या पुरस्कर्ता असल्याचे सासूबाई बद्दल निशा धोंगडे यांनी गौरवोद्गार काढून सासू-सून या नात्यातील दुरी दूर करण्याचा संदेश दिला आहे. एक कुटुंब चालवून सहा महिन्याच्या चिमुकल्या चिउला दुधाविना दिवसभर घरी ठेवून कार्य करून सायंकाळी जेव्हा घरी यायची तेव्हा आईकडे ते माझे छोटीशी जीव अगदी हसत खेळत दिसायची तेव्हा मनाला फार आनंद मिळायचा अश्या निशा धोंगडे म्हणतात.

सासूबाईच्या प्रेमळ, पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या भूमिकेमुळे तसेच कुटूंबाचा भार सांभाळून घेण्याच्या वृत्तीमुळे समाजसेवा करण्याची एक ताकद व प्रेरणा मला मिळाली. त्यामुळेच ठरवलं आई आहे तोपर्यंत तरी आपण सामाजिक सेवा करायच. जमेल तितके काम करायचं. तसं करत असतांना सहज आईच्या विश्वासामुळे आणि मदतीमुळे एवढे दिवस कार्य करीत राहिले. समाजसेवा करणे काही साधं सोपं काम नाही तरीही मला सदैव प्रत्येक गोष्टीत मदत करून पाठीशी खंबीरपणे उभे राहून सूख दुःखात साथ देऊन माझा परिवार पूर्ण सांभाळून मला काम करण्याचा बळ माझ्या सासूबाई देत असतात.

मी आज गेली पंधरा वर्षांपासून समाजसेवेमध्ये रममान असणारी निशा धोंगडे आज हे सर्व काही शक्य केले ते फक्त माझ्या सासूबाई मुळे केले म्हणून आजच्या पुरस्काराच्या मानकरी खऱ्या माझ्या सासुबाई शोभाताई धोंगडे आहेत हे सांगायला मला खूप आनंद होतो आहे.
त्यांच्यामुळेच आज मला शासनाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे यापेक्षा मोठे भाग्य ते कोणते असे भावोद्गार निशा धोंगडे यांनी मनोगत व्यक्त करतांना प्रतिनिधी जवळ काढले.