महाडीबीटी लॉटरी चा मेसेज तर आला आहे परंतु मध्ये कोणत्या घटकासाठी निवड झाली ते कसे पहायचे?

67

शेतकरी बांधवानो, महा डीबीटी पोर्टल (mahadbt)द्वारे कृषि विभागातील विविध योजना जसे की, कृषि यांत्रिकीकरण, सिंचन साधने आणि सुविधा, फलोत्पादन

  • प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – प्रती थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन घटक)
  • कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान
  • राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान : अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस
  • बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (आदिवासी उप योजना / आदिवासी उप योजना बाह्य)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
  • एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
  • कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम
  • भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
  • राष्ट्रीय कृषी विकास योजना – रफ्तार
  • राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना
  • मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना

या मुख्य घटकांसाठी अर्ज मागविले जातात. तर विविध योजनांसाठी लाभार्थी निवड प्रक्रिया ही ऑनलाइन असून महाडीबीटी पोर्टल द्वारे लाभर्थ्यांची निवड केली जाते.तर ही निवड प्रत्येक आठवड्यामध्ये केली जात आसून निवड झालेल्या लाभर्थ्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल वर निवड झाल्या बाबतचा संदेश देखील दिला जातो आणि निवड झालेल्या बाबींसाठी कागदपत्रे ही अपलोड करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातात परंतु ही निवड कोणत्या घटकासाठी, औजारे साठी झालेली आहे ते कसे पहायचे हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

स्टेप:1 महाडीबीटी mahadbt वेबसाइट वरती लॉगिन करावे

तर यासाठी आपल्याला mahdbt वेबसाइट वरती लॉगिन करावे लागणार आहे. लॉगिन केल्यानंतर निवड झालेली असेल तर असा संदेश दिसेल

स्टेप:2 मी अर्ज केलेल्या बाबी हा पर्याय निवडावा

यामध्ये आपल्याला अद्यापपर्यन्त केलेले सर्व अर्ज दिसतील.

स्टेप:3 अद्यापपर्यन्त केलेले अर्ज व सद्यस्थिती दर्शविलेली असेल

यामध्ये आपण पोर्टल स्थिति आणि घटक तपशील पाहू शकतातर अशा प्रकारे आपण महाडीबीटी mahadbt पोर्टल वर निवड झालेल्या बाबींचा घटक तपशील पाहू शकतो.