महाआयटीच्या सेवांमध्ये आता ‘फिफो’ प्रणाली लागू मनमानीला बसणार चाप: कागदपत्रांचा प्रवास होणार सुकर
महाआयटी अंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या सर्व सेवांमध्ये २९ रोजीपासून ‘फिफो’ (फर्स्ट इन फर्स्ट आउट) प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामुळे प्रथम अर्ज करणाऱ्याचाच अर्ज निकाली काढून पुढील अर्ज निकाली काढावा लागणार आहे. त्यामुळे विविध कागदपत्रांसाठी सेतू केंद्रांवर अर्ज करणाऱ्या नागरिकांना आता दिलासा मिळाला असून, महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मनमानीला देखील चाप बसणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त विविध उपक्रमांच्या माध्यमातून शासन आपल्या दारी उपक्रम राबविण्यात येत आहे. अशातच आता महाआयटीच्या सर्व सेवांमध्ये फिफो हे नवे ऑप्शन लागू करण्यात आले आहे. नागरिकांना आवश्यक असणाऱ्या विविध सेतू केंद्रांच्या माध्यमातून महसूल विभाग सेवा पुरवितो. त्यामुळे शैक्षणिक उत्पन्न, रहिवासी, जात, शेतीविषय असे आवश्यक सर्व दाखले या ठिकाणी पुरविले जातात. मात्र, काही ठिकाणी तहसीलचा संबंधित विभाग व सेतू केंद्र संचालकांच्या लागेसंबंधाने अनेक दाखले प्राधान्याने क्रमवारीत न देता आर्थिक व्यवहार करून उशिरा अर्ज करणाऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जात
होते. त्यामुळे या मनमानीचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता; मात्र आता याला चाप बसणार आहे….
प्रमाणपत्राचे शुल्क
असे…..
■ जात प्रमाणपत्र : ५६ रुपये (स्कॅनिंगचे पैसे अतिरिक्त)■ प्रतिज्ञापत्र : ३४ रुपये (स्कॅनिंगचे
पैसे अतिरिक्त्त)■ नॉन क्रिमिलेअर : ५६ रुपये(स्कॅनिंगचे पैसे अतिरिक्त)■ वय अधिवास : ३४ रुपये(स्कॅनिंगचे पैसे अतिरिक्त)■ उत्पन्न 34 रुपये(स्कॅनिंगचे पैसे अतिरिक्त)किती दिवसांतमिळणार…■ वय, अधिवास १५ दिवस■ जातीचे ४५ दिवस■ उत्पन्न १५ दिवस■ नॉन क्रिमिलेअर २१ दिवस■ रहिवासी ७ दिवसअशी व्हायची गडबड…..
■ ‘आपले सरकार’च्या संकेतस्थळावर प्रमाणपत्र मिळण्यासाठी कुणी घरुन तर कुणी आपले सरकार सेवा केंद्रावरून अर्ज करीत असतात.
■ तीन डेस्कच्या माध्यमातून हे अर्ज निकाली काढण्यात येतात.
■ एका दिवशी साधारणत ५० अर्ज प्राप्त झाल्यास त्यापैकी कोणते अर्ज आधी निकाली काढावे, याचे स्वातंत्र्य संबंधित डेस्कप्रमुखाला आहे.
■ त्यामळे आधी अर्ज करूनही
काय आहे ‘फिफो प्रणाली ?
■ फर्स्ट इन, फर्स्ट आउट ही एक इन्व्हेंटरी पद्धत आहे. जी आतापर्यंत उद्योग,
व्यापार क्षेत्रात वापरली जात होती; मात्र आता ती महाआयटी अंतर्गत सर्व
सेवांमध्ये वापरण्यात येणार आहे.
■ पहिला आलेला अर्ज हाच पहिला अर्ज असल्याचे गृहित धरुन यानंतर पुढील अर्ज निकाली काढण्यात येणार आहे.
अनेकांचे अर्ज उशिरा निकाली निघत होते. यामुळे नागरिकांच्या
तक्रारीही वाढल्या होत्या.
■ काम लवकर करून घेण्यासाठी दलालही सक्रिय झाले होते. अधिक पैसे दिल्यास दलाल हे कर्मचाऱ्याला हाताशी धरून लवकर काम करून घेत होते. ■ दलालांकडूनच काम लवकर होत असल्याने स्वतः घरून अर्ज करण्यास नागरिक फारसे उत्सुक
नसायचे.
■ या सर्व प्रकाराला आता नव्या ‘फिफो’ प्रणालीमुळे चाप बसणार आहे. !
प्रमाणपत्राचे नाव मिळकतीचे प्रमाणपत्रभाषांतर मराठी