पशुसंंवर्धन विभाग, पंचायत समीती सावलीच्या वतीने सभागृहात बिडीओ मधुकर वासनिक यांचा स्वागत व व्रणोपचारक खुशाल शेडमाके यांच्या सेवानिवृत्त निमित्याने सपत्नीक सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहा.संवर्ग विकास अधिकारी जगन्नाथ तेलकापल्लीवार होते प्रमुख अतिथी संवर्ग विकास अधिकारी मान. मधुकर वासनिक ,कृषी अधिकारी सुुशिल आडे,प्र.पशुधन विकास अधिकारी डॉ.डी.बी.कापगते, स.पशुधन विकास अधिकारी डॉ बंडू आकनुरवार, डॉ.भालेराव, डॉ.कांबळे,सत्कारमूर्ती व्रणोपचारक खुशाल शेडमाके सपत्नीक होते.प्रथम संवर्ग विकास अधिकारी मधुकर वासनिक नुकतेच रुजु झाल्याबद्दल पशुसंंवर्धन विभागातर्फ स्वागत करण्यात आले.पशुदवाखाना उपरी येथुन निवृत्त झालेले व्रणोपचारक खुशाल शेडमाके यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ ,पुष्पगुच्छ व भेट वस्तु देऊन पशुसंंवर्धन विभागाच्या वतीने मान्यवरांंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सविअ वासनिक ,सहा.सविअ तेलकापल्लीवार ,कृषी अधिकारी आडे,पविअ कापगते,सहा.पवीअ डॉ बंडू आकनुरवार ,डॉ भालेराव,डॉ.कांबळे, पशुधन पर्यवेक्षक सुवर्णा नखाते,सत्कारमूर्ती खुशाल शेडमाके,चतुर्थ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कमलाकर केेमेेकार यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक / संचालन डॉ बंडू आकनुरवार व आभार अशोक भांडेकर यांनी केले.यशस्वीतेसाठी डॉ येरमलवार, सुवर्णा नखाते,नम्रता मडीवार , भुवनेश्वर गणवीर,बेबी कोपुलवार रवींद्र रामटेके,कुुनघाडकर यांनी परीश्रम घेतले.
Home आपला जिल्हा Breaking News पशुसंंवर्धन विभागातर्फ बिडीओ वासनिक यांचे स्वागत व शेडमाके यांचा निवृत्ती निमित्याने सपत्नीक...