दुर्मिळ प्रजातीच्या कासवाची सुटका : दोघे ताब्यात

95

चंद्रपूर : विक्री करण्यासाठी ठेवन्यात आलेल्या एशियाटिक सॉफ्ट शेल  या दुर्मिळ प्रजातीच्या कासवाची गोंडपिपरी सुटका केली असून तिघां आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंडपिपरीचे ठाणेदार प जिवन राजगुरु यांना, भंगारपेठ येथील संशयीत इसम  प्रमोद भगाकर पोटे याचे घरी एशियाटिक सॉफ्ट शेल हा दुर्मिळ प्रजातीचा कासव विक्री करीता ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे भंगार पेठ येथे छापा टाकुन घराची झडती घेतली असता त्याचे घरात 25 हजार रुपये किमतीचा एशियाटिक सॉफ्ट शेल या दुर्मीळ प्रजातीचा कासव (एक नग) आढळून आला. त्यास त्यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने दुर्मीळ प्रजातीचा कासव कासव इतर इसम रविंद्र व्यंकोजी मडपल्लीवार रा. शिवणी देशपांडे ता. गोंडपिपरी याचे कडुन घेतले असल्याचे माहिती दिली आहे. यावरुन इसम नामे (1) प्रमोद भगाकार पोटे, वय 37 वर्ष, रा.भंगारपेठ ता. गोंडपिपरी (2) रविंद्र व्यंकोजी मडपल्लीवार  रा. शिवणी देशपांडे ता. गोंडपिपरी यांना तसेच एक नग 25000 रुपये किंमतीचा  दुर्मीळ प्रजातीचे कासव ताब्यात घेवुन वन परिक्षेत्र अधिकारी, धाबा परिक्षेत्र ता. गोंडपिपरी यांना पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी स्वाधीन करण्यात आले आहे.  

पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु हयांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक जिवन राजगुरु,  वंदीराम पाल, नंदकिशोर माहुरकर, अनुप निकुरे,  प्रेम चव्हाण व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, पोउपनि विनोद भुरले, पोहवा प्रकाश बल्की, सुभाष गोहोकार आणि सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार मुजावर अली व कार्तीक खनके यांनी केली आहे.