साचणारे पाणी नगरपरिषदेला दिसत नाही का?वास्तव : डबक्यात पडून अपघाताची दाट शक्यता

78

मुल शहरातील  परिसरात जाताना विश्रामगृह रोड च्या बाजूलाअलीम पठाण यांच्या घरासमोरील  मोठे खड्डे पडले आहे. यात पावसाचे पाणी साचल्या जात असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे. याठिकाणी पडलेल्या खड्डे बुजविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

शहरातील आत शिरणाऱ्या रस्त्याचे मेन रोड ला लागून असलेल्या अतिक्रमण 2 महिण्याच्या अगोदर थातूर मातूर करून रस्ता मोकळा करून दिला पण अजून पर्यंत सिमेंट,किंवा डांबरी करण ,साधा मुरूम टाकला नाही अजून पर्यंत रस्ता जाण्यासाठी वहीवाटीसाठी झालेला नाही.

अलीम पठाण यांच्या घराजवळून वळण मार्गावर असलेल्या मोठा खड्डा पडला आहे. यात पावसाचे पाणी साचते. हिच स्थिती आजूबाजूची आहे. पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन समस्या सोडवावी अशी मागणी अलीम पठाण, जुन्या वस्तीमधील नागरीकांनी आदींनी केली आहे.