रेल्वेस्टेशन पोचमार्गाची अवदशा जिवघेणी? * रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

94

मूल ( तालूका प्रतिनिधी).
अनेक रेल्वे गाडयांचा थांबा असलेल्या व सतत वर्दळ असलेल्या
रेल्वे स्टेशन पोचमार्गाची अवदशा बघता हा पोचमार्ग जीवघेणा, अपघाताला
आमत्रण देणारा ठरत असल्याची
ओरड सुरू आहे.
गत अनेक वर्षापासून डागडूजी करण्याची तसदी रेल्वे प्रशाशनाने न
घेतल्याने आता भर पावसाळयात या
पोचमार्गावरून वाहने कशी चालवावीत हा सवाल उपस्थित होत आहे.
मुल येथे रेल्वेस्टेशन कडे जाणाऱ्या या पोच मार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्यामध्ये पावसाचे पाणी साचले आहे .पाणी भरल्याने रस्ता आहे कुठे हे कळायला मार्ग् उरत नसल्याचे चित्र आहे.पावसाचे पाणी साचल्याने हे खड्डे वाहनधारकासाठी जिवघेणे ठरत आहे . गोंदिया बल्लारपूर रेल्वे पॅसेंजर व अनेक एक्स्प्रेस गाडयांचा थांबा इथे आहे.दिवसा व रात्रो या मार्गावर प्रवासी वाहने चालतात.इतरही खाजगी वाहनांची वर्दळ या पोचमार्गावर असते.रैल्वे कर्मचारी सुद्धा ये जा करण्याकरीता याच मार्गाचा वापर करीत असतात.मात्र रेल्वे प्रसाशन या पोचमार्गाचे नुतनीकरण का करीत नाही? या मार्गावरील खडडे पाण्यानी तुडुब भरून असल्यामुळे वाहनधारकाला खड्याचा अंदाज समजून येत नसल्याने गाडी खड्यात जाऊन अपघात झाला तर याला जबाबदार कोण? हा सवाल उपस्थित होतो. तसेच मुल येथील
सर्वच नागरिक रोज सकाळी फिरायला ( मार्निंग वाक) याच मार्गावरून जातात.
खड्ड्यात पाणी साचल्याने व खड्डे तुडुंब पाण्यानी भरले असल्याने
एखाद्या व्यक्तीचा पाय खड्यात गेल्यास यावेळेही अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
सदर पोच मागं अंदाजे ७५० ते ८०० मिटर लाबीचा असून चंदपूर महामागांला जोडल्या गेलेला आहे.
गत अनेक वषांपासून या पोचमार्गाची साधी डागडूजी सुद्धा रेल्वे
विभागाने केलेली नाही.जनतेची मोठी ओरड असूनही लोकप़तिनिधी सुद्धा याकडे दुलक्ष करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

रेल्वे प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन या पोचमार्गाची डागडूजी
करावी अशी मागणी होत आहे.