आधारकडून आलेला हा मेसेज फेक नाही, तुम्हाला देखील आला असेल तर लगेच करा ‘हे’ काम

65

आधार कार्ड म्हणजे आपल्या ओळखीचे सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज. आज बँकेत खाते उघडायचे असो की कोणत्याही शाळेत प्रवेश घ्यायचा. सगळीकडे त्याची गरज आहे. अनेकदा आधारशी संबंधित फेक म्हणजेच खोटे मेसेज पाठवले जातात. याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला देण्यात येतो. आता मात्र आधारशी संबंधित अत्यंत महत्वाचा मेसेज सरकारकडून पाठविण्यात येत आहे.  जर तुम्हालाही आधार कार्ड उपडेट करा (Update Aadhar Card) असा मेसेज आला असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता मार्गदर्शक तत्त्वांचे नक्की पालन करा.

काय आहे UIDAI चा मेसेज?

तुमच्या आधार क्रमंाक मध्ये दस्तऐवज अपडेट आवश्यक आहे. ओळख आणि पत्याचा दस्ताऐवजांचा पुरावा अपडेट करण्यासाठी आधार केन्द्राला भेट दया अशा प्रकारचा मोबाईलवर नागरीकांना माॅसेज आलेला आहे तरी आज शनिवार व रविवार ला मुल तहसील कार्यालयातील पंचायत समिती कार्यालयातील आधार केंन्द्र चालू आहे.

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) अशा आधार कार्ड धारकांना, ज्यांचे कार्ड 10 वर्षे पूर्ण होणार आहे, त्यांचे बायोमेट्रिक तपशील अपडेट करण्यासाठी संदेश पाठवत आहे. मेसेजमध्ये आधार कार्डच्या वैधतेच्या शेवटच्या तारखेचा संदर्भ देत असे म्हटले जात आहे की, ‘कृपया तुमच्या जवळच्या आधार केंद्राला भेट देऊन तुमचे बायोमेट्रिक्स तपशील त्वरित अपडेट करा. हे कोणतेही शुल्क न घेता करता येते. हा संदेश काहीसा अशा प्रकारचा आहे.

अपडेट करणे का आवश्यक आहे?

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने अलीकडेच जारी केलेल्या त्यांच्या एका अधिसूचनेत म्हटले आहे की, आधार अपडेट केल्यानंतर वापरकर्त्यांशी संबंधित अचूक माहिती सेंट्रल आयडेंटिटी डेटा रिपॉझिटरी (CIDR) मध्ये उपलब्ध होईल. आधार कार्डधारक ओळखपत्र आणि पत्त्याच्या पुराव्याद्वारे त्यांचे आधार कार्ड नोंदणीच्या तारखेपासून दर 10 वर्षांनी अद्यतनित करू शकतात. तपशिल अद्ययावत करण्यासाठी नियमावली आणि तरतूदीमध्येही बदल करण्यात आले आहेत.