शेतकऱ्यांनो, एक रुपयात काढा पीकविमा @कृषी विभागाचे आवाहन

59

मागील काही वर्षांपूर्वी  पीकविम्याबाबतच्या तक्रारी पुढे येत होत्या. नुकसानभरपाईच्या किचकट प्रक्रियेमुळे, तसेच लेटलतीफ कारभारामुळे शेतकरी त्रस्त होत होते. आता प्रक्रियेत बऱ्याच सुधारणा झाल्या असून, केवळ एक रुपयात शेतकऱ्यांना पीकविमा काढण्याची संधी आहे. अखेरची तारीख ३१ जुलै असून, शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी  यांनी केले आहे.
मागील वर्षी  शेतकऱ्यांनी पीकविमा काढला. सर्वच शेतकऱ्यांना २५ टक्के आपत्कालीन नुकसानभरपाईची रक्कम वितरित करण्यात आली. 
शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत नुकसानभरपाईची माहिती कंपनीकडे नोंदवावी. ही तक्रार कंपनी, ऑनलाइन किंवा कृषी विभागाकडे करावी, अशीही कृषी विभागाचे यांनी व्यक्त केली. पीकविम्यासाठी सातबारा, आधार, बँक पासबुक आणि स्वयंघोषणापत्राची गरज असून, अधिकाधिक शेतकऱ्यांनी केवळ एक रुपयात पीकविमा काढावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पीकांचा पीक विमा ३१ जुलैपर्यंत एक रुपयात काढून घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी  यांनी केले आहे.नैसर्गिक आपत्ती व इतर कारणांमुळे पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतो. अशा वेळी शेतकऱ्यांना पिकाची नुकसान भरपाई मिळावी म्हणून सरकारच्या वतीने ‘पंतप्रधान पीक विमा योजना’ सुरू करण्यात आली. या पूर्वी पिकविम्याच्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागत होती. मात्र, यंदा एक रुपयात पिकविमा काढून मिळणार आहे. सध्या शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी केली आहे. या पिकाला संरक्षण मिळावे, यासाठी सरकारने पीक विमा योजना सुरू केली. पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पिकासाठी संरक्षित असणारी रक्कम मिळणार असून, या वर्षापासून एका पिकाला केवळ एक रुपया लागणार आहे.पिक विमा काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

– आधार कार्ड- सातबारा व एकूण जमिनीचा दाखला- पीकपेरा स्वयंघोषणापत्र- बँक पासबुक
पीक विमा एक रुपयातच निघतो. एकाही ‘सीएससी’ केंद्राला याव्यतिरिक्त अधिक पैसे देऊ नये. जास्त रक्कम कोणी मागत असेल, तर तहसीलदार किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तक्रार करावी असे आवाहन तालुका कृषी यांनी केले आहे.