प्रमाणपत्रांसाठी खिशात ठेवा फक्त ३४ रुपये
शासकीय कार्यालयांमधील हेलपाट्यांमधून मुक्ती; लाचखोरीला लागणार लगाम
रहिवासी उत्पन्न, जातीचा
दाखला, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रांसाठी पूर्वी शासकीय कार्यालयांमध्ये उबरठे झिजवावे लागायचे. त्यात प्रमाणपत्रांसाठी पाचशे ते हजार रुपये मोजावे लागायचे. मात्र, ‘आपले सरकार’ केंद्रामुळे कागदपत्रांची धावपळ दूर झाली असून, अर्ज सादर केल्यावर तातडीने प्रमाणपत्र मिळत आहे.
विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी वय, राष्ट्रीयत्व, तर ज्येष्ठांना योजनांच्या अर्जासाठी विविध कागदपत्रांची आवश्यकता असते. त्यासाठी तहसील कार्यालयात जावे लागते. उंबरठे झिजवूनही प्रमाणपत्र वेळेत मिळत नव्हते. मात्र, आता जिल्ह्यात ४४७ ‘आपले सरकार’ केंद्र कार्यान्वित झाल्याने काही दिवसांतच प्रमाणपत्र मिळत आहे.
५०० रुपये वाचल्याचे समाधान
पूर्वी प्रमाणपत्रांसाठी शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागत. टेबलाखालून पैसे दिल्यावर प्रमाणपत्रावर सही होत असे. मात्र, आता अर्ज केल्यावर काही दिवसांतच प्रमाणपत्र मिळत आहे. त्यामुळे ५०० रुपये वाचल्याचे समाधान आहे.
वेळ आणि पैशांची होतेय बचत…..
प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यावर काही दिवसांतच प्रमाणपत्र मिळत आहे. त्यामुळे वेळ आणि पैशांची बचत होते. विद्यार्थ्यांनाही गैरसोयीला सामोरे जावे लागत नाही. दिलेल्या कालावधीतच प्रमाणपत्र मिळत असल्याने मदत होत आहे.
असा करा अर्ज
– आपले सरकार पोर्टलवर ५१ सेवेसाठ आनलाइन अर्ज करता येणार आहेत. यासाठी आवश्यक ती कागदपत्रे आनलाइनच जोडावी लागतील. दिलेल्या मुदतीत अर्जदारास संबंधित कागदपत्र उपलब्ध होतील. काही त्रूट असल्यास संबंधित अर्जदारास
मोबाइल क्रमांकावर एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.
या आहेत सेवा महसूल विभाग
वय, राष्ट्रीयत्व, रहिवास, ज्येष्ठ नागरिक, ऐपत दाखला, सांस्कृतिक कार्यक्रम परवाना, अल्पभूधारक दाखला, भूमिहीन शेतमजूर, शेतकरी असल्याचा दाखला, अधिवास, उत्पन्न अशा दाखल्यांसाठी आनलाइन अर्ज करता येतील.
भूमी अभिलेख
मिळकत पत्रिका, औद्योगिक वापर, मोजणी नकाशा व क प्रत पुरविणे, आकारफोड पत्रक तयार करणे, कमी जास्त पत्रक तयार करणे, फेरफार नोंदणी, मिळकत पत्रिकेची पोटविभागणी, विकास परवानगीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे, अकृषिक आकारणीची सनद देणे.
करमणूक विभाग
बहुविध यंत्रणा परिचालकास परवाना देणे, स्थानिक केबलचालक प्रसारणास परवाना, पूल गेम, व्हिडिओ खेळगृह, मनोरंजन उद्यान, जलक्रीडा
आर्केस्ट्रा, एकपडदा चित्रपट गृह,
व्हिडिओ प्रर्शन दाखले असे विविध
प्रकारच्या ५२ दाखल्यांचा यात समावेश आहे.
प्रमाणपत्र किती रुपयांत
प्रमाणपत्र
शुल्क
उत्पन्न दाखला
३४
जातीचा दाखला
३४
अल्प भूधारक दाखला
३४
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक
३४
शेतकरी दाखला
३४
नॉन क्रिमिलेयर दाखला
३४
रहिवासी दाखला
३४
ज्येष्ठ नागरिक दाखला
३० टक्के महिला आरक्षण ३४
३४
संजय गांधी योजना
३४
भूमिहीन दाखला
३४
नवोदय दाखला
३४
Home आपला जिल्हा Breaking News प्रमाणपत्रांसाठी खिशात ठेवा फक्त ३४ रुपये@शासकीय कार्यालयांमधील हेलपाट्यांमधून मुक्ती