मूल चंद्रपूर मार्गावरील डोनी फाट्याजवळ@दुचाकीला धडक, दोघे गंभीर

58

 मूल मार्गावर  दुचाकीला धडक, दोघे गंभीर @गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झाला अपघात
मूल : चंद्रपूरकडून मूलकडे जाणाऱ्या बोलेरो वाहनाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने यात दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना मूल चंद्रपूर मार्गावरील डोनी फाट्याजवळ मंगळवारी दुपारी १२ वाजता घडली.
बोलेरो चालक निखिल बाबुराव आकुलवार (४१) रा. आंबेडकर नगर वडगाव (चंद्रपूर) तर दुचाकीचालक लक्ष्मण बोळन लेनगुरे (३७) रा. उमरी पोद्दार, ता. पोंभुर्णा असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. चंद्रपूरवरून मूलकडे भरधाव वेगाने जाणारी बोलेरो (क्रमांक एमएच 3X बी.आर. २५८२) चालकाचे.
गाडीवरील नियंत्रण सुटल्याने मूलकडून भाजीपाला घेऊन उमरी पोद्दारकडे दुचाकी (क्रमांक एम.एच- ३४ ए. क्यू ९०८१) जात असताना समोरून बोलेरोने जोरदार धडक दिल्याने दुचाकी चालकाच्या पायाला गंभीर दुखापत होऊन उजवा पाय तुटला तर बोलेरो चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सुदैवाने बोलेरो गाडीत चालक एकटेच होते तर दुचाकीवरही दुचाकीस्वार एकटेच असल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच मूल पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन जखमींना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात
आले आहे