पेरणीचा खर्च पाण्यात; दुबार पेरणी करणार कशी? शेतकरी पेचात@मारोडा येथील

62

बरसलेला धो धो पाऊस आणि नदी व नाल्यांना आलेल्या पुराच्या तडाख्यात विविध भागात पिके पाण्याखाली बुडाल्याने, पेरणीचा खर्च पाण्यात गेला. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले.

मात्र, खरीप पीक पेरणीचा कालावधी संपल्यात जमा असल्याच्या पार्श्वभूमीवर आता दुबार पेरणी करणार कशी, याबाबतचा पेच शेतकऱ्यांसमोर निर्माण झाल्याचे वास्तव आहे.
यंदाच्या पावसाळा सुरू झाल्यानंतर गेल्या महिनाभराच्या कालावधीत पावसाने दांडी मारल्याने, जिल्ह्यात खरीप पिकांची पेरणी रखडली होती. गेल्या २ जुलैपासून रिमझिम पावसाने हजेरी सुरू केल्याने, रखडलेली पेरणी सुरू झाली.

पेरणी पूर्ण झाली असतानाच गेल्या 20जुलै रोजी रात्रभरधुवाधार पाऊस बरसला. त्यामध्ये  तालुक्यासह  महसूल मंडळांच्या परिसरात अधिक पाऊस पडल्याने जोरदार बरसलेला पाऊस आणि नदी व नाल्यांना पूर आल्याने, नदी व नाल्याकाठच्या भागात शेतजमीन पिकांसह खरडून गेली. तसेच विविध भागात पाऊस आणि पुराचे पाणी शेतात साचल्याने, पेरणीनंतर उगवलेली पिके पाण्याखाली गेली. पिके पाण्यात बुडाल्याने, पिकांच्या पेरणीसाठी केलेला खर्चही पाण्यात गेला. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणी केल्याशिवाय पर्याय उरला नाही  खर्च पाण्यात बुडाला आहे, असे येथील शेतकरी विकास देवरावजी नेत्तूलवार .रा मारोडा..ता.मूल. जि. चंद्रपूर

मूल पासून सहा किलोमीटर अंतरावरील मारोडा गावात आपल्या शेतात धआनरओवणईनंतर पुराचे पाणी शिरल्याने धानपिकाचे प्रचंड नुकसान झाले असून कृषी विभागाने तातडीने चौकशी करून पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी यासाठी मारोडा गावातील विकास नुत्तुलवार यांनी तालुका कृषी अधिकारी यांचेकडे निवेदन सादर करुन मागणी केली आहे. याच निवेदनाच्या प्रतीलिपी , तहसीलदार , गटविकास अधिकारी व तलाठी मारोडा यांनाही देण्यात आल्या आहेत.

निवेदनातून नुकसानभरपाई मिळावी यासाठी मारोडा येथील विकास नुत्तुलवार यांनी पुढाकार घेत निवेदनातून मागणी केली आहे. विकास देवरावजी नेत्तूलवार .रा मारोडा..ता.मूल. जि. चंद्रपूर
माझी रोवलेली मौजा मारोडा येथील 3 एकर शेती पुराच्या पाण्यामध्ये पूर्णपणे बुडालेली आहे तरी त्वरित मोक्का पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी