मूल : शेतात उगवलेल्या मशरुमची भाजी खाल्याने विषबाधा झाल्याची घटना आज सकाळी घडली. सदर प्रकार लवकर लक्षात आल्याने अनर्थ टळला.
तालुक्यातील चिमठा येथील विशाल मांदाडे यांच्या शेतात निघालेले मशरुम त्यांच्या कुटुंबियानी घरी आणुन आज सकाळी त्याची भाजी बनवली. वर्षा विशाल मांदाडे (28 वर्षे) मुलगा विहान विशाल मांदाडे (8 वर्षे) आणि घराशेजारी राहणारे बोळण लेनगुरे यांचे कडे शिकायला असलेली त्यांची नातीन ऋतुजा मोहूर्ले (14 वर्षे) यांनी खाल्याने काही वेळातच त्या तिघांनही उलट्या होवु लागल्या. जेवनात काहीतरी वेगळ खाण्यात आल्याने उलट्या होत असाव्या. असे लक्षात येताच त्यांना मूल येथील उपजिल्हा रुग्णालय आणण्यात आले. जेवनात मशरुम खाण्यात आल्याने उलट्या होत असल्याचे निदान होताच प्राथमिक उपचार करून तिघांनाही पुढील उपचासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले. सध्या तिघांचीही प्रकृती सुधारत असुन वेळीच लक्षात आल्याने संभाव्य धोका टळल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगीतले. पावसाळ्यात शेतशिवारात निघणाऱ्या पाले व फळ भाज्या ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतमजुर मोठ्या प्रमाणावर खात असतात. अलीकडे शहरातही शेतशिवारातील विविध प्रकारच्या पालेभाज्या विकल्या जातात. भाजीपाल्याच्या वधारलेल्या भावात शेतशिवार आणि जंगलात उगवणा-या पाले व फळभाज्या इतरही लोक मोठ्या आवडीने खात असतात. आरोग्य आणि चवीच्या दृष्टीने ग्रामीण व शहरी भागात शेत व जंगल शिवारात उगवणा-या विविध प्रकारच्या भाज्या खाल्य जात असताना नागरीकांनी काळजी घेतली पाहीजे. हे आजच्या घटनेवरून निदर्शनास आले.