तेजस कोतकोंडावार प्रगती काॅम्यूटर मूल येथील संगणक आॅपरेटर कौतुकास्पद कामगिरी, १ रुपयाही न घेता 250 शेतकऱ्यांचा भरला मोफत पिक विमा
मूल येथीलतेजस कोतकोंडावार प्रगती काॅम्यूटर मूल येथील संगणक आॅपरेटर यांनी १ रुपयाही न घेता २ हजार ५०० शेतकऱ्यांचा पिक विमा मोफत भरला आहे. इतर सी. एस. सी. केंद्र चालक शेतकऱ्यांची आर्थिक लुट करीत असताना chandrapur जिल्ह्यात तेजस कोतकोंडावार यांनी खरोखरच कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सर्वसामान्य शेतकऱ्यांना मदत होईल म्हणून १ रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, यापुर्वी शेतकऱ्यांना पिक व क्षेत्रानूसार पाचशे रुपयांच्या पेक्षा जादा रक्कम भरावी लागत होती. परंतु यावेळी मात्र सरकारने फक्त एक रुपया भरून पिक विम्याची सोय । केली आहे. mul तालुक्यासहअनेक सी. एस. सी. केंद्र चालक पिक विम्यासाठी शेतकऱ्यांकडून १०० रुपये घेऊन असताना MUL येथील तेजस कोतकोंडावार प्रगती काॅम्यूटर मूल येथील संगणक आॅपरेटर यांनी मात्र शेतकऱ्यांकडून कसलीही फी न आकारता मोफत पिक विमा भरून देण्याचे अभिनंदनीय काम केले आहे असे
शेतकरी मंगेश गायधने अंतरगाव पारडवाही येथील यानी सांगितले. तेजस कोतकोंडावार यांनी प्रत्येकी १०० रुपया प्रमाणे घेतले असते तरी २५०० शेतकऱ्यांची अडीच लाख रुपये एवढी रक्कम जमा झाली असती. कधी सुलतानी तर कधी अस्मानी संकटांचा सामना करत
कंटाळून जीवनयात्रा संपवतात. शेतकऱ्यांना फुल नाही तर फुलांची पाकळी म्हणून आधार देण्याचे काम तेजस कोतकोंडावार करीत आहेत. सी. एस. सी. केंद्र चालकांनी शेतकऱ्यांकडून पैसे घेऊ नये, पीकविम्याचा अर्ज भरण्याचा खर्च म्हणून प्रत्येक अर्जापोटी ४० रुपये विमा कंपनी आपले सरकार’ सेवा केंद्राला देणार आहे. परंतु असे असतानाही काही सी. एस. सी. केंद्र चालकांकडून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या आर्थिक लुट सुरू आहे. राज्य सरकारने १ रुपयात पीक विमा योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे, ३१ जुलै शेवटची तारीख आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यांचा फायदा घ्यावा असे आवाहन तेजस कोतकोंडावार यांनी केले.
Home आपला जिल्हा Breaking News तेजस कोतकोंडावार कौतुकास्पद कामगिरी, १ रुपयाही न घेता २५०० शेतकऱ्यांचा भरला @मोफत...