मुल@मणिपूर मधील नराधमांना फाशीची शिक्षा द्या,रॅली काढून उपविभागीय अधिकारी यांना अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी म्हणून निवेदन

142

मणिपूर राज्यातील दंगलीमध्ये महिलांवर अत्याचार करून धिंड काढणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकाय संस्था,भारत सोमवारी दिनांक 24 जूर्ले 2023 ला रोजी दुपारी 12.00 गांधी चाौक ते तहसील कार्यालय,मूल  पदाधिकाऱ्यांनी सोमवारी केली.

 यावेळी म्हणाले, मे महिन्यापासून मणिपूर राज्यात दंगली उसळल्या आहेत.  घटनेमुळे आम्ही सर्वजण देशातील लोकशाही टिकेल की नाही या चिंतेत आहोत. आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.मणिपूर येथील महिलांवरील अत्याचार व हत्येच्या विरोधात जन आक्रोश मोर्चा

मणिपूर येथे महिलांवरील झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुल येथे दिनांक २४/०७/२०२३ सोमवार दुपारी १२ वाजता गांधी चौक ते तहसील कार्यालय रॅली काढून उपविभागीय अधिकारी यांना अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी म्हणून निवेदन देण्यात आले.

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था स्त्री शक्ती ग्रुप तसेच महिला हिंसा प्रतिबंध समिती मुल तर्फे हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी उपस्थित तेजस्विनी नागोसे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नेफडो, रत्ना चौधरी नागपूर विभाग अध्यक्ष, नलिनी अडपवर चंद्रपूर जिल्हा महिला हिंसक प्रतिबंधक समिती उपाध्यक्ष, स्मिता बांडगे चंद्रपूर जिल्हा संघटिका, मीरा शेंडे मूल तालुका अध्यक्ष, कुमुदिनी भोयर मूल तालुका युवती अध्यक्ष, शशिकला गावतुरे मूल तालुका संघटिका, फार्जाना शेख सामाजिक कार्यकर्त्या, नंदा शेंडे सुनिता खोब्रागडे कल्पना मेश्राम सुजाता बर्डे या सर्व मूल तालुका संघटिका, वंदना वाकडे मूल शहर संघटिका, मधुरी लेनगुरे, सीमा लोनंबले, शुभांगी शेन्डे, पुषवहा, चन्नावार बाकी सामाजिक कार्यकर्त्या उपस्थित होते.