संजय गांधी निराधार / श्रावणबाळ / वृध्दापकाळ योजनेच्या बैठकीत 69 प्रकरणे मंजूर@नवनियुक्त अध्यक्ष व सर्व सदस्यांचा झाडाचे रोपेटे देऊन स्वागत

81

मूल तहसील कार्यालयाच्या सभागृहात  संजय गांधी निराधार योजनेच नायब तहसिलदार ओंकार ठाकरे यांनी नवनियुक्त अध्यक्ष व सर्व सदस्यांचा झाडाचे रोपेटे देऊन स्वागत करण्यात आले .

संजय गांधी निराधार कमिटीचे अध्यक्ष वंदना अगरकाटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बैठकीस तहसीलदार डाॅ.रविंन्द्र होळी,नायब तहसिलदार ओंकार ठाकरे, शासकीय सदस्य तथा गटविकास अधिकारी   आदी उपस्थित होते.
संजय गांधी निराधार योजने अंतर्गत विविध योजनांचे अर्ज मंजूर करण्यात आले व काही त्रुटी असणारे अर्ज अर्जदारांकडून पूर्तता करण्यात येऊन सादर करण्यात येतील, अशी माहिती संजय गांधी निराधार कमिटीचे अध्यक्ष यांनी दिली.

आज दिनांक 27/07/2023 रोजी सकाळी 12.00 वाजता संजय गांधी निराधार योजना समितीच्या मासिक सभेचे वंदना अगरकाटे यांच्या अध्यक्षते खाली तहसिल कार्यालय मुल येथे आयोजन करण्यात आलेले होते.

संजय गांधी निराधार योजना पात्र प्रकरण 22 , इंदिरा गांधी विधवा योजना 14, इंदिरा गांधी अपंग योजना 02,श्रावणबाळ योजना 28, वृध्दपकाळ योजना 3 एकूण प्रकरणे 69 पात्र प्रकरण निकाली काढण्यात आले.

सदर सभेमध्ये समितीचे अध्यक्ष/सदस्य यांनी उपस्थित राहून प्रकरणे मंजूर करण्यात आले.

दर महिन्याला संजय गांधी निराधार योजनेची बैठक होणार असल्याचे या वेळी ठरविण्यात आले.

या बैठकीसाठी अव्वल कारकून , लिपिक , सहायक , संगणक सहायक ,  आदींनी परिश्रम घेतले.