वाघाच्या हल्यात इसम जखमी@ बेलघाटा येथील सेवक सयाजी कोवे

72

वाघाच्या हल्यात इसम जखमी… बेलघाटा येथील सेवक सयाजी कोवे वय ५५ वर्ष राहानार बेलघाटा ता.मूल हे बेलघाटा गावालगत च्या शेतात गूरे चराई करत असतांना वाघाने त्यांचावर हल्ला करुन गंभीर जखमी केले.. घटनेची माहिती मिळताच वनरक्षक आर.व्ही.धनविजय, वनरक्षक एस.डब्लू.बोनलवार व बेलघाटा चे पोलीस पाटील चंद्रशेखर येरमे यांनी घटनास्थळी जाऊन जखमी इसमाला त्वरित मूल उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आनले व प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. ही घटना दुपारी दोन वाजता दरम्यान ची आहे….